Home Uncategorized स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शहीद भगतसिंग यांची जयंती उत्साहात साजरी -NNL

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शहीद भगतसिंग यांची जयंती उत्साहात साजरी -NNL

by NNL ऑनलाईन

नांदेड| भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्ययन व अध्यापन केंद्रामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले सर तर उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते माननीय मंगेश दादा कदम यांची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर जोगेंद्र सिंह बिसेन सेंसर कुलसचिव सर्जेराव शिंदे व परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर रवी सरोदे सर जनसंपर्क अधिकारी अशोक कदम डॉक्टर राजाराम माने सिनेट सदस्य बंटी गायकवाड डॉक्टर दिलीप चव्हाण यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद भगतसिंग व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबेडकर आंबेडकर प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले . मी नास्तिक का आहे ही पुस्तिका देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मंगेश दादा कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भगतसिंगाच्या विचारांची गरज आजच्या पिढीला असल्याचे सांगितले. भगतसिंगाच्या विचारच आजच्या काळात लोकांना दिशा देऊ शकतो असा विचार त्यांनी मांडला.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते म्हणून संशोधक विद्यार्थी रवींद्रसिंग ताटू यांनी आपल्या सखोल व अभ्यासपूर्ण मांडणी भगतसिंग यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोप कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांनी करताना आजच्या तरूण पिढीने भगतसिंग यासारखे ध्येय ठेवून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी नियमितपणे अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक हनुमंत कंधारकर यांनी केले तर आभार आनंद घोडवाडीकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतीक राऊत, पवन वडजे ,ओमकार पाटील, सुधाकर राठोड, नागेश पतंगे, देवानंद शिंदे, रोहिदास दुधाटे, गजानन पडोळे यासह अनेक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!