Home नायगांव निराधार वृद्ध मातेला चोळी-लुगडी भेट देऊन डॉ रोहित माडेवार‌ यांचा वाढदिवस साजरा -NNL

निराधार वृद्ध मातेला चोळी-लुगडी भेट देऊन डॉ रोहित माडेवार‌ यांचा वाढदिवस साजरा -NNL

नायगांव येथील समाजसेवक शिवानंद पांचाळ यांच्या पुढाकाराने अनोखा उपक्रम

by NNL ऑनलाईन

नायगांव| महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.कर्मवीर मा.सा.दादासाहेब कन्नमवार यांचे पणतू तथा रोटी फाउंडेशनचे अध्यक्ष मा.डॉ.रोहित दादा माडेवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ‌ यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकांना यातून काही तरी प्रेरणा मिळावी या प्रामाणिक भावनेतून नायगांव बाजार येथे निराधार वृद्ध गरीब असलेल्या मातेला चोळी-लुगडी मिठाई भेट देऊन सन्मान केले. समाजात असे अनेक अनाथ वयोवृद्ध लोक आहेत, त्यांच्या उतरवयात काळजी घेणारे कोणी नाही, पैशाअभावी अनेक अनाथ असलेल्या वयोवृद्धांची अत्यंत वाईट अवस्था आहेत.

अशा‌ मातृपितृतुल्य वृद्धांसाठी रोटी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ रोहित दादा माडेवार नागपूर यांनी आज त्यांच्या जन्मदिनी‌ – कर्मवीर दादासाहेब कन्नमवार वृद्धाश्रमाचे लोकार्पण करून वृद्धाश्रम नागपुर येथे‌ सुरु केले आहेत. दादासाहेब कन्नमवार वृद्धाश्रमात आजारी वयोवृद्धांची देखभाल,‌ व त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या कडून सामाजिक कार्याचा वारसा लाभलेले डॉक्टर रोहित माडेवार‌ यांनी आतापर्यंत गरीब गरजू असलेल्या बालकांचे आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, पर्यावरण रक्षण, पशुपक्ष्यांसाठी अनेक असे उपक्रम राबवले आहेत.

डॉक्टर रोहित दादा माडेवार यांनी करत असलेल्या मानव सेवा पशुपक्षी सेवा कार्याचा उल्लेख कमी शब्दात करता येणार नाही. त्यांनी चांपा या नांवाने असलेलं नागपूर तालुक्यातील नागपूर जिल्ह्यातील येथील हे गांव देखील गोरगरिबांच्या दीनदुबळ्यांचा अनाथाच्या सेवा कार्यासाठी दत्तक घेतले आहेत. चांपा या गांवात पारधी सामाजाचे दैवत श्री समशेरसिंग पारधी भोसले यांचा पूर्णाकृती पुतळा संपूर्ण भारतात प्रथमच चांपा गांवात उभारण्याचे कार्य देखील‌‌ डॉक्टर माडेवार यांच्या हातून घडुन आले आहे. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस नांदेड जिल्ह्यातील नायगांव बाजार येथे अनाथ वृद्ध मातेला चोळी-लुगडी मिठाई भेट देऊन शिवानंद पांचाळ यांनी साजरा केला आहे.

यावेळी उपस्थित गौतम वाघमारे, प्रकाश वाघमारे, आशीफ भाई, राजपाल सोनटक्के, बनकर, सह आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमाने शहरात चांगलीच वाहवाह होताना दिसत आहे, याप्रसंगी शिवानंद पांचाळ म्हणाले की निराधार दिव्यांग वयोवृद्ध यांच्यातच देव आहे. समजुन सामान्य माणसाला आधार देण्यासाठी मी देखील छोटासा प्रयत्न करत आहे. शंभर टक्के समाजकारण हा स्वर्गीय कर्मवीर मा.सा.दादासाहेब कन्नमवार यांच्या विचारांचा वारसा घेऊन काम करत आहे, असे मत शिवानंद दत्तात्रय पांचाळ‌ यांनी मांडले आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!