Home लोहा फिरत्या कोरोना लसीकरण केंद्राची तहसीलदाराकडून पाहणी -NNL

फिरत्या कोरोना लसीकरण केंद्राची तहसीलदाराकडून पाहणी -NNL

by NNL ऑनलाईन

लोहा| राज्यात ८ ते १४ ऑक्टोबर या काळात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात व्हावे यासाठी “मिशन कवच कुंडल” अभियान राबविण्यात येत आहे. लोहा शहरातील फिरत्या कोरोना लसीकरण केंद्रास तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी भेट दिली व माहिती घेतली. यावेळी लोहा सज्जा चे तलाठी मारोती कदम यांनी कोरोना लस घेतली.

कोरोना लसीकरण झपाट्याने व्हावे यासाठी राज्यात १४ऑक्टोबर पर्यन्त मिशन कवच कुंडल” राबविण्यात येत आहे. तालुक्यात ३४ठिकाणी लस उपलब्ध आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ मिरकुटे यांनी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात कोरोना लस देण्याचे नियोजन केले आहे. तर शहरात ग्रामीण रुग्णालयात तसेच फिरते केंद्र उभारण्यात आले आहे. मुख्याधिकारी पेंटे यांचे सहकार्य घेऊन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अब्दुल बारी यांचे आरोग्य यंत्रणा लसीकरणासाठी वार्डा वार्डात जात आहे.तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी शहरसतील फिरत्या कोरोना लसीकरण केंद्रास भेट दिलीं.

लोह्याचे तलाठी मारोती कदम यांनी विशेष मोहीम अंतर्गत लस घेऊन मोहीममध्ये उत्साह निर्माण केला. अशीच अपेक्षा सर्वांकडून आहे. आणि सर्वांनी टीम वर्क करणे आवश्यक आहे व नगर पालिका, पंचायत समिती व शिक्षण विभाग यांनी आरोग्य विभाग सोबत योग्य नियोजन केले तर आपले लसीकरण जास्तीत जास्त गतीने होण्यासाठी निश्चित मदत होईल. अशी अपेक्षा तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी व्यक्त केली. यावेळी आरोग्य विभागाचे सुपरवायझर सुर्यवंशी,फार्मसिस्ट धनंजय संगवे, १०८ चे चालक ससाणे यासह कर्मचारी उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!