Home मुखेड जेष्ठ पत्रकार कालिदास कुलकर्णी यांचे निधन -NNL

जेष्ठ पत्रकार कालिदास कुलकर्णी यांचे निधन -NNL

by NNL ऑनलाईन

मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड येथील जेष्ठ पत्रकार श्री कालिदास राजेश्वरराव कुलकर्णी वय (62 वर्षे) यांचे शनिवार दि.09 रोजी सकाळी 11 वाजता रहाते घरी मुखेड येथे निधन झाले आहे.

श्री कालिदास कुलकर्णी यांनी दैनिक लोकमत चे मुखेड तालुका प्रतिनिधी म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. त्यांच्या पश्चात 3 भाऊ, 2 बहिणी असा मोठा परिवार आहे. मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ॲड.आशिष कुलकर्णी यांचे काका होत. या निधनाबद्दल आ.डाॅ. तुषार राठोड, नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, मा.आ.किशनराव राठोड, मा.आ.सुभाष साबणे, मा.आ.अविनाश घाटे, मा.आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, मा.जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, मा.नगराध्यक्ष गंगाधर राठोड, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव अण्णा साठे, मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष ॲड.संदिप कामशेट्टे व अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!