Home स्पोर्टस क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी -प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन – NNL

क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी -प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन – NNL

by NNL ऑनलाईन

नांदेड| भारत सरकार खेळांना महत्त्व आणि खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे. आंतरराष्ट्रीय स्थरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना तर वर्ग-१ ची नोकरीसह करोडो रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात येत आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही आपले करिअर करावे. क्रीडा क्षेत्रातही अनेक सुवर्णसंधी उपलब्ध आहेत. त्यासाठी सराव – सराव आणि सराव आवश्यक आहे. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांनी यावेळी वक्त केले. ते दि.१४ ऑक्टोबर रोजी भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागामार्फत ‘फ्रीडम रण २.०’ फिटनेस की डोस आधा घंटा रोज’ ‘वेटलिफ्टिंग प्रशिक्षण शिबीर’ व वृक्षारोपण या कार्यक्रमाचे आयोजन दि.३० सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात प.पू. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी आनंद बारपुते, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुंढे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार व परमज्योतसिंघ सिंधू हे उपस्थित होते.  या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे यांनी केले.

‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन   

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षात आज दि. १५ ऑक्टोबर २०२१ रोजी  माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  या प्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, रामदास खोकले, बबन हिंगे यांच्यासह इतर अधिकारी/ कर्मचारी यांनी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!