Home मनोरंजन चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे -NNL

चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे -NNL

by NNL ऑनलाईन

नांदेड| कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनामार्फत वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन आदेशान्वये विविध बाबींवर, कामावर आणलेले निर्बंध पूनर्विचारांनी शिथिल करण्यात येत असून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 11 ऑक्टोंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार चित्रपटगृहे, नाट्यगृहे, बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे निर्गमित करण्यात आले आहेत.

त्याअनुषंगाने शासन मार्गदर्शक सूचनांचे तसेच अटी व शर्तीचे पालन करण्याच्या अधीन राहून चित्रपटगृहे, नाट्यगृहे, बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व अटी व शर्तीचे तंतोतंत पालन होत असल्याची खात्री करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!