Home नवीन नांदेड गोदावरी अर्बन तर्फे आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान -NNL

गोदावरी अर्बन तर्फे आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान -NNL

नविन नांदेड। नवरात्रीचा जागर म्हणजे स्त्रीमधील देवत्वाचं पूजन आणि हेच औचित्य साधून कष्ट करणाऱ्या, रानावनात राबणाऱ्या मायमाऊलींचा सन्मान करतेय गोदावरी अर्बन आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनानिमित्त गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील व अध्यक्षा राजश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालकधनंजय तांबेकर आणिविपणन व्यवस्थापक महेश केंद्रे यांच्या नियोजनात गोदावरी अर्बनने आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस साजरा केला.

महिला शेतकरी कामगार च्या कष्टाला गोदावरीचा मायेचा पदर अर्थात रानात काम करतांना घरच्या पुरुषांचे शर्ट घालून शेतात राबणाऱ्या माउलीला उन्हापासून बचाव व्हावा यासाठी गोदावरी तर्फे सनकोट ची छोटीशी भेट सिडको शाखेच्या वतीने कापसी गावातल्या महिला शेतकरी श्रीमती राणी अनिल जल्लावार कापसी(बु)शिवनकाम ,संगीता गणेश जल्लावार शिवनकाम, कान्होपात्रा सचिन परडे सोनखेड मूर्ती बनवने ,लक्ष्मीबाई काशिनाथ बहने,सरस्वती ईश्वरराव ढगे यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी सिडको शाखेचे पालक संचालक साहेबराव ममिलवाड सिडको शाखेचे शाखा व्यवस्थापक पंकज इंदुरकर,अधिकारी उमाकांत जंगले,अधिकारी राजकुमार सोनकांबळे तसेच ठेविदार श्री प्रमोद मैड सर, साखरे बालाजी उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!