Home नांदेड अतिवृष्टीच राज्य सरकारच अनुदान शेतकऱ्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यावर वर्ग करावेत -NNL

अतिवृष्टीच राज्य सरकारच अनुदान शेतकऱ्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यावर वर्ग करावेत -NNL

जिल्हा प्रशासनाकडे भागवत देवसरकर यांची मागणी

by NNL ऑनलाईन

नांदेड। राज्य सरकारने जाहीर केलेले अतिवृष्टीचे अनुदान पी एम किसान योजना व पिकविमाच्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यातच जिल्हा प्रशासनाने वर्ग करून शेतकऱ्याचे सणासुदीचे दिवस साजरे करावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी नांदेडच्या जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.

 

शेतकऱ्यांचे या अगोदरचे अनेक वर्षापासून राज्य सरकारने दिलेले सर्व अनुदानाचे पैसे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये जिल्हा प्रशासन वर्ग करत होते,जिल्हा प्रशासनाने पैसे वर्ग केल्यानंतर नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्यांच्या शाखेच्याअंतर्गत येणाऱ्या गावाच्या A ते Z अश्यासिरीयल नुसार गावातील शेतकऱ्यांना अनुदान वाटप करत असते, यामध्ये शेतकऱ्याच्या अतिवृष्टी अनुदान वाटपासाठी बऱ्याच महिन्याचा कालावधी लागतो,मागील अनेक वर्षांचा अनुभव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची अत्यंत गरज आहे,त्यामुळेच शेतकऱ्याच्या थेट राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यात अनुदानाचे पैसे जिल्हा प्रशासनाकडून वर्ग करण्यासाठी मा.जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन अतिवृष्टीचा आलेलं अनुदान, पिकविमा, पी एम किसान निधीप्रमाणे थेट शेतकऱ्याच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यात वर्ग करावं.

 

जेणेकरून शेतकऱ्यांना तात्काळ पैसे मिळतील व जिल्हा मध्यवर्ती बँकेपुढे शेतकऱ्यांना अनुदानाच्या पैशासाठी रांग लावायची गरज पडणार नाही अशी आग्रही मागणी निवेदनात नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून भागवत देवसरकर यांनी केली आहे,याबाबत तात्काळ जिल्हा प्रशासनाने योग्य ते निर्णय घेऊन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा महसूल प्रशासनाकडे अगोदरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे किसान सन्मान योजनेसाठी लागणाऱ्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे खाते क्रमांक असल्यामुळे हा निर्णय घेण्यास जिल्हा प्रशासनाला काही अडचण जाणार नाही,त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ हा निर्णय देऊन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी विनंती निवेदनात केली असल्याचेही भागवत देवसरकर यांनी सांगितले आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!