Home आर्टिकल्स घेता संघर्षाची मशाल हाती -NNL

घेता संघर्षाची मशाल हाती -NNL

by NNL ऑनलाईन

संघर्षाशिवाय जीवन कसले , मग तिथे कोणीही असो माणूस, प्राणी , निसर्ग आणि अगदी निर्जिव वस्तू सूद्धा संघर्षाशिवाय फूलले नाही. संघर्ष नसला असता तर इतिहासच घडला नसता, थोर शास्त्रज्ञ घडले नसते, एवढेच काय तर जीवन सूद्धा यशस्वी झाले नसते. माणसाला प्रत्येक क्षेत्रात त्रास भोगल्याशिवाय सूख भेटत नाही .अगदी लहान मूलापासून तर वडीलधाऱ्या मंडळी पर्यंत संघर्ष अटळ आहे , लहान बाळाला जर भूक लागली आणि आई एखाद्या वेळेस कामात गूंतलेली असेल तर तिला आठवण करून देण्यासाठी बाळाला रडावं लागत हा संघर्ष नाही का ? त्याची भूक भागवण्याठी रडून आपल्या आईला जागं करावच लागणार आहे.

मानवाला कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही त्यासाठी परीश्रम घ्यावे लागतात, आयूष्य जगण्याठी प्रत्येक वळण पार करावे लागते , कठीणप्रसंगी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन त्यावर सतत मात करावी लागते . तरच जिवन हे सार्थकी लागते नाहीतर काहीही मिळणार नाही. इतिहासामध्ये वळूण बघितल्यावर कितीतर ऊदाहरणे पहायला मिळतात . स्वातंत्र्य लढा असेल , राजकीय संघर्ष असेल , आपला वयक्तिक हक्क असेल , यासाठी आंदोलन ,मोर्चे या माध्यमातून लक्ष वेधून आपले हक्क मिळवण्यासाठी लढतांना आपण पाहिले आहे.

अस्पृश्य समाजासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा दिला, “शिका संघटिक व्हा आणि संघर्ष करा” असा संदेश त्यांनी दिला .अडाणी, अस्पृश्य ,दूर्लक्षित समाजाला एकत्रित आणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पूढाकार घेतला आणी संघर्ष करून त्या समाजाला मूख्य प्रवाहात आणले. स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अन्यायाविरूद्ध मोहिम ऊभारली. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी थोर समाजसूधारकांनी इंग्रजाविरूद्ध एकजूटीने लढा दिला म्हणून आपल्या या भारत देशाला स्वातंत्र मिळाले. हे सर्व एकजूटीच्या मेहनतीचे, संघर्षाचे फळं आहे.

निसर्गाला सूद्धा जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो, जमीनीतून वर येण्यासाठी अंकूराला कसरत करावी लागते तेव्हा ते आकाशात झेप घेते. अडचणीवर मात करून जेव्हा आपणं यश संपादन करतो तेव्हा आपला आनंद द्गिगूणीत होतो. शाळेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी चांगले गूण मिळावे म्हणून अभ्यास करून परीक्षा देतात . जे चांगले मार्क मिळवतील ते जिवनात यशस्वी होतात. जिवन असेच आहे, प्रत्येक कठीण वळण पार केल्याशिवाय सूख मिळत नाही.

शेतकरी आपल्या शेतात कष्ट करून घाम गाळून , मेहनत करून ऊत्पन्न काढतो, वारा, ऊन, पाऊस सहन करत बारा महिने तो राब-राब राबतो जिवाची लाही लाही करतो, तरी उत्पन्नाची हमी नाही हवढा संघर्ष करून सूद्धा हाती काही राहत नाही, तरी पण भविष्याची आशा धरून आपल्या काळ्या आईची सेवा करतच असतो. क्षेत्र कोणतेही असो प्रत्येक क्षेत्रात पूढे जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी , उंच शिखर गाठण्यासाठी , पराक्रमाची पराकाष्टा करण्यासाठी, यश संपादन करण्यासाठी, जिवनात यशस्वी व्हायचे असेल, तर प्रत्येक गोष्टीसोबत संघर्ष हा करवाच लागणार आहे. संघर्षात भाजून निघालेला माणूस समोर आपल्या आयुष्यात कधीही मागे येत नाही . आणी त्यातून मिळालेले फळ समाजाच्या भल्यासाठी वापरल्याशिवाय तो राहत नाही. आपल्या संघर्षातून मिळालेला अनूभव त्याला जीवनात खूप काही शिकवून जातो. तो जेव्हा त्यात यशस्वी होतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा भाव खूप काही शिकवून जातो…

घेता संघर्षाची मशाल हाती
खडतर मार्ग पळून जावं
ध्येय गाठता ऊजळेल जीवन
तेव्हा जगात त्याचे होईल नाव!

लेखक – दत्ताहरी एकनाथराव कदम
मू . पो .मातूळ ता .भोकर, जि .नांदेड, मो. 9764961245

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!