Home बिलोली शिवसेनेने खूर्चीसाठी महायुती तोडली -डॉ भागवत कराड -NNL

शिवसेनेने खूर्चीसाठी महायुती तोडली -डॉ भागवत कराड -NNL

कुंडलवाडी येथील प्रचार सभेत प्रतिपादन

बिलोली, अशोक हाके। २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपाने महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली व महाराष्ट्राच्या जनतेंनी महायुतीला बहुमत हि दिले,पण शिवसेनेने खुर्चीसाठी महायुती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करून भाजपाला धोका दिला असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी कुंडलवाडी येथील जाहीर प्रचार सभेत केले आहे.

कुंडलवाडी येथील मुख्य बाजारपेठेत भाजपाचे अधिकृत उमेदवार सुभाष साबने यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी उपस्थित मतदारांना संबोधतांना असे म्हणाले की,२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपाने महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढली व महाराष्ट्राच्या जनतेंनी महायुतीला बहुमत दिले,पण शिवसेनेने खुर्चीसाठी महायुती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करून भाजपाला धोका दिला,गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडीने कुठल्याही विकासाच्या योजना आणल्या नाही उलट फडणवीस सरकारने जे विकासाचे निर्णय घेतले होते त्याला स्थगिती देण्याचे काम केले.

 

त्यात प्रामुख्याने जलयुक्त शिवार योजना हि देशात गाजली ती योजना महाविकास आघाडीने बंद केले,तसेच महायुतीच्या काळात पंच्यात्तर टक्के शेतकऱ्यांना पीकविमा मिळत होता पण महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये पंधरा टक्के शेतकऱ्यांना सुद्धा पीकविमा मिळत नाही,या सरकारची नियत शेतकऱ्यांच्या बाबतीत ठीक नाही,उलट मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजनेतून प्रतिवर्षी दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. असे प्रतिपादन केले तर पुढे बोलताना,मी आपल्या समोर पंतप्रधान मोदी यांचा प्रतिनिधी म्हणून उभा आहे या तालुक्याच्या विकासासाठी विकास निधी कमी पडू देणार नाही,या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुभाष साबने यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन मतदारांना केले..

यावेळी भाजपा प्रवक्ते गणेश हाके,आमदार राजेश पवार, वैद्यकीय आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अजित गोपछडे, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, पूनम पवार,माणिकराव लोहगावे,धनराज गुट्टे,रवींद्र पोटगंटीवार,यादवराव तुडमे,व्यंकट पाटील गुजरीकर, श्रीनिवास पाटील नरवाडे,विठ्ठलराव कुडमुलवार,आदींसह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!