Home क्राईम कारला येथे एकाच रात्री चोरट्यांनी दोन घर फोडले ग्रामीण भागात चोरीच्या प्रमाणात वाढ -NNL

कारला येथे एकाच रात्री चोरट्यांनी दोन घर फोडले ग्रामीण भागात चोरीच्या प्रमाणात वाढ -NNL

by NNL ऑनलाईन

हिमायतनगर। तालुक्यातील मौजे कारला गावात दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीची संधी साधत रविवार च्या रात्री चोरट्यांनी दोन घरे फोडून घरातील कपाटातील साहित्य फेकले हि घटना घर मालकांना देखील सकाळी जाग ऐताच लक्षात आल्याने खळबळ उडाली आहे.

हिमायतनगर ग्रामीण भागात गत काही दिवसापासून चोरींचे प्रमाण वाढले आहेत. सध्या शेतकऱ्यांचा माल विक्री होत असल्यामुळे चोरट्यांनी ग्रामीण भागात लक्ष केंद्रीत केले असून अनेक गावात चोरी चे प्रमाण वाढले आहे. कारला येथे गेल्या वर्षी एका शेतकऱ्यांच्या एक लाख रुपये किमतीच्या म्हैस चोरी गेल्या होत्या.

त्याबरोबरच दि. 17 आक्टोबर रोजी रात्री कारला येथे दुर्गा देवी विसर्जन होते. दिवसभर मिरवणुकीत नागरिक गुंग असल्याने रात्री अज्ञात चोरट्यांनी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान अशोक बोंपिलवार व संदीप चप्पलवाड यांच्या घरात प्रवेश करीत घरातील कपाट फोडले त्यातील साहित्य फेकून दिले.

कपाटात काही मिळाले नसल्याने घरातील डबे फोडून बॅग रस्त्यावर फेकून दिली होती. घरातील कुटुंब झोपेत असताना चोरट्यांनी चाणाक्ष पध्दतीने चोरी केली. चोरट्यांच्या हाती काही लागले नाही परंतु सदरील चोरी मुळे कारला गावासह परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलीस प्रशासनाने ग्रामीण भागात होणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. कारला येथील जमादार कनाके, शेख यांनी घटना स्थळी भेट दिली असता चोरट्यांचा बंदोबस्त लवकरच लावणार असल्याचे सांगितले आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!