Home खास न्यूज शिवसैनिक संतोष पुल्लेवार यांनी “ग्रामभुषण गौरव सत्कार सोहळा” कार्यक्रमाच आयोजन -NNL

शिवसैनिक संतोष पुल्लेवार यांनी “ग्रामभुषण गौरव सत्कार सोहळा” कार्यक्रमाच आयोजन -NNL

by NNL ऑनलाईन

हिमायतनगर। तालुक्यातील पोटा बु. येथे माजी सरपंच सौ. सत्वशिलाबाई लक्ष्मण पुल्लेवार, व शिवसैनिक संतोष पुल्लेवार यांनी “ग्रामभुषण गौरव सत्कार सोहळा” कार्यक्रमाच आयोजन केल आहे.

पोटा बु व पंचक्रोषीत शैक्षणिक, सामाजीक, आरोग्य, अशा विविध पदांवर राहुन सेवा देणारे पदाधिकारी, शेक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचा गौरव करण्याच्या हेतुने माजी सरपंच सौ. सत्वशिलाबाई लक्ष्मण पुल्लेवार, व शिवसैनिक संतोष पुल्लेवार यांनी दि. ७ नोव्हेंबर रविवारी ग्रामभुषण सत्कार सोहळा ठेवला आहे, या कार्यक्रमासाठी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंतभाऊ पाटिल, गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटिल व माजी आमदार नागेश पाटिल आष्टीकर यांना विशेष निमंत्रण देण्यात आल असुन त्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

त्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ कोकाटे, जि.प. माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील आष्टीकर, भगवानराव पाटील पाथरडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश भाऊ घंटलवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. संजय पवार, शिवसेना जिल्हा समन्वयक अ़ॅड. परमेश्वर पांचाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देशाईराव देशमुख कांडलीकर, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख विशाल राठोड, सरपंच श्रीमती लक्ष्मीबाई बापूराव जाधव यांचीही उपस्थिती राहणार आहे.

कोविड-१९ चे नियम पाळुन कार्यक्रम होणार असुन या सोहळ्याला उपस्थित राहण्याच आवाहन माजी सरपंच सौ. सत्वशिलाबाई लक्ष्मण पुल्लेवार, व शिवसैनिक संतोष पुल्लेवार यांनी केल आहे. संतोष पुल्लेवार हे कडवे शिवसैनिक असुन सामाजीक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असतो, राजकारणा बरोबर समाजकारण व्हाव या हेतुने पंचक्रोषीत चांगल काम करणाऱ्या लोकांचा गौरव व्हावा या हेतुन या ग्राम भुषण गौरव सत्कार सोहळ्याच आयोजन करण्यात आल आहे, यामुळे पुर्वी कामे केलेल्या सत्कार मुर्तीचा गौरव पाहुन सध्या काम करत असलेल्यांना काम करण्याची नवी जीद्द उर्जा मिळते, अशांचा गौरव करन आपल कर्तव्य बनते अस संतोष पुल्लेवार यांनी माध्यमांना सांगितल.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!