Home क्राईम रेल्वेलाईन कर्मचारी इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कंत्रादाराकडून हिमायतनगरात विजेची चोरी -NNL

रेल्वेलाईन कर्मचारी इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कंत्रादाराकडून हिमायतनगरात विजेची चोरी -NNL

उपकार्यकारी अभियंत्याने झापल्यानंतर दुसऱ्या दिवशी केला वीजचोरीचा पंचनामा

by NNL ऑनलाईन

हिमायतनगर,अनिल मादसवार| विजेवर धावणाऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरु असल्याने हिमायतनगर रेल्वे स्थानकावर वाढीव इमारतीचे बांधकाम केले जात आहे. या कामावर महावितरण कडून कुठलीही परवानगी अथवा अधिकृत वीज जोडणी न घेता तारांवर आकडे टाकून वीज जोडणी घेऊन बांधकाम करणाऱ्या रेल्वेच्या ठेकेदारावर महावितरण कर्मचाऱ्यांनी कार्यवाही केली आहे. यात अनाधिकृत वीज जोडणीचे साहित्य ज्यात दोन रंगाचे सर्व्हिस वायर, कीटकॅट, स्विच बोर्ड जप्त केले आहे. त्यामुळे शहरात सुरु असलेल्या अश्या बांधकामावर वीजपुरवठा चोरून वापर होत असल्याचे उघड झाले असून, संबंधीत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पारदर्शकपणे कार्यवाही केल्यास महावितरणचा लाखो रुपयाचा तोटा भरून निघणार आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पिंपळखुटा ते मुदखेड ब्रॉडगेज रेल्वेलाईन विजेवर सुरु करण्यासाठी गट दोन वर्षपासून यासाठी लागणारे तत्सम साहित्य, वाढीव इमारतीच्या कामांना वेग आला आहे. त्या इमारतीचे काम हिमायतनगर शहरालगत असलेल्या रेल्वेचे जागेत सुरु आहे. सदर काम सुरु असताना गज कामापण्यासाठी वापरण्यात येणारी विजेवरील ग्लाइण्डर मशीन, हॅन्ड ग्लाइण्डर, वेल्डिंग मशीन, आणि रात्रीची देखभाल होण्यासाठी पथदिवे ज्यात एलईडी फोकस, सर्व विजेवर चालणारी उपकरणांसाठी फुलेनगर गावठाण डि.पि.वरून आलेला लघुदाबाच्या हेद्रे यांच्या शेतातील घराजवळील पोल वरून थेट तार जुन्या दूरसंचार विभागाच्या पोलपर्यंत ओढून त्यास बिनदिक्कतपणे वायर लावून दररोज जवळपास 26.5 K.W. विजेचा वापर केला जात होता.

हा प्रकार मागील दोन वर्षांपासून सुरु असताना या परिसरात कित्येक वेळा महावितरणचे अधिकारी सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेल्यानंतर देखील त्यांना हा प्रकार कसा निदर्शनास आला नसावा असा प्रश्न नागरीकातून केला जात आहे. वृत्त लिहीपर्यंत वीजचोरी करणाऱ्यावर पंचनाम्यात नमूद डी.एम.दहिफळे आणि विवेक इंजिनियरिंग यांच्या दंडाच्या रक्कमेची अधिकृत आकडेवारी मिळाली नसली तरी अंदाजित २५ लाखाहून अधिकची वीजचोरी केल्याचे प्राथमिक स्वरूपात चर्चिले जात आहे. या संदर्भात महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता श्री लोणे यांच्याशी संपर्क साधला असता वीजचोरी झाली हि घटना सत्य आहे. या संबंधीचा अहवाल प्राप्त झाला असून, दंडाच्या रक्कमेचा ताळेबंद निघाला नाही. सदर व्यक्तीने आकारलेला दंड न भरल्यास कायदेशीर पोलीस कार्यवाही केली जाईल असे ते म्हणाले.


रेल्वे क्वार्टरचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून वीजचोरी होत असल्याची माहिती सबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांना काही जणांनी मंगळवारी दिली होती. मात्र कनिष्ठ अभियंता व प्रभारी सहाय्यक अभियंता पावन भडांगे यांनी या ठिकाणी येऊन कार्यवाही करण्यास टाळाटाळ केली. तक्रारकर्ते रात्री १० पर्यंत अभियंत्याची वाट पाहून छायाचित्र घेऊन परत गेले. त्यांनी हा प्रकार कार्यकारी अभियंता गोपुलवाड व उपकार्यकारी अभियंता लोणे यांच्या कानावर टाकली. त्यावरून उपकार्यकारी अभियंता श्री लोणे यांनी प्रभारी सहाय्यक अभियंता शहरी पवन भडगे यांना झापल्यानंतर दुसऱ्या दिवशी दि.२० बुधवारी रोजी सकाळी ११ प्रभारी सहाय्यक अभियंता व लाईनमन विशाल जेजरवाड यांनी रेल्वे वसाहतीच्या कामावर भेट देऊन पाहणी करत वीजचोरीच्या घटनेचा पंचनामा केला आहे.

महावितरणच्या मालकीच्या एलटी पोलवरून अधिकृत जोडण्या दिल्या जातात परंत्तू हिमायतनगर शहरात रेल्वेच्या बांधकामावर घेण्यात आलेला अनधिकृत वीजपुरवठा हा जुन्या एलटी पोलवरून दूरसंचार विभागाच्या जुन्या पोलवर चिनी मातीच्या चिमण्याला बांधून घेण्यात आला होता. त्याचा दूरसंचावर विभागाच्या पोलवरून सर्व्हीस वायरच्या साहाय्याने मेनस्विच बोर्डात अनधिकृतपणे वीज जोडणी घेऊन वापर केला जात होता. असे असताना जप्तीची कार्यवाही करणाऱ्या कनिष्ठ अभियंता पावन भडांगे यांनी जप्ती पंचनाम्यात केवळ २ रंगाचे सर्व्हिस वायर, कीटकॅट -३ ची जप्ती दाखविली असून, कार्यवाही सौम्य करण्याच्या उद्देशाने करण्यासाठी कि काय..? एलटी पोलपासून जुन्या दूरसंचार विभागाच्या पोलपर्यंत वापरण्यात आलेला जर्मन तार का..? जप्त केला नाही हे न उलगढ़णारे कोडे उपकार्यकारी अभियंता लोणे सोडविणे गरजेचे आहे.

वीजचोरी कळवा बक्षीस मिळावा याचा फायदा कुणाला..?
मागल्या काही वर्षपूर्वी महावितरण कंपनीने वीज चोरी कळवा बक्षीस मिळावा हि मोहीम चालू केली होती. या योजनेतून वीजचोरीची माहिती देणार्यास वीज चोरीच्या १० टक्के रक्कम माहिती देणार्यास दिले जायचे. अश्या कार्यवाहीत माहिती देणाऱ्याचे नाव या सर्व प्रक्रियेत गुप्त ठेवण्यात येते असे. दिलेल्या माहितीवर तात्काळ कारवाई व तपासणी करने, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज चोरीची माहिती थेट संचालक दक्षता व सुरक्षा यांना दूरध्वनीवरून देणे आवश्यक आहे. मात्र यावरही काही वीजग्राहक नवनवीन युक्त्या वापरून विजेची चोरी करीत असतात. असाच प्रकार हिमायतनगर शहरातील रेक्वे क्वार्टरचे काम करणाऱ्या ठेकेदाराने केल्याचे समोर आले आहे. गेल्या दिड वर्षांपासून संबंधितांनी महावितरण विभागातील हिमायतनगरचे कनिष्ठ अभियंता व लाईनमनला हाताशी धरून चोरीची वीज वापरली असल्याचा धक्कादायक प्रकार पत्रकार मंडळींनी उघड केल्याने शहरातील अनेक वीज चोरांचे धाबे दणाणले आहे. आता या बाबतीत महावितरणचे वरिष्ठ अधिकारी समबंधितांवर नियमानुसार कार्यवाही करतील कि पळवाटा काढून जुजबी कार्यवाही करून आपले हात ओले करीत..? याकडे नियमित देयके भरून महावितरणच्या खंडित वीजपुरवठ्याचा सामना करणाऱ्या वीजग्राहक व शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

 

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!