Home करियर ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये जेष्ठ नागरिकांना पीएच.डी. करण्यासाठी सूट -NNL

‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये जेष्ठ नागरिकांना पीएच.डी. करण्यासाठी सूट -NNL

by NNL ऑनलाईन

नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये अनेक जेष्ठ नागरिकांनी पीएच.डी. करावी. त्यांच्या अनुभवातून समाज उपयोगी संशोधन व्हावे. असा उदार हेतू लक्षात घेवून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या आदेशान्वये आणि  विद्यापरीषदेच्या बैठकीतील निर्णयानुसार जेष्ठ नागरिकांना पीएच.डी. कोर्सवर्क मधून सूट देण्यात आलेली आहे.  

जेष्ठ नागरिक म्हणून वयाची ६० वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना विद्यापीठामध्ये पीएच.डी. करणे सोपे झाले आहे. पीएच.डी. करण्यासाठी पेट (PET-Ph.d. Enterance Test) परीक्षा पास होणे आवश्यक आहे. पण जेष्ठ नागरिकांना यामधूनही सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जेष्ठ नागरिकांना पेट परीक्षा देणे आवश्यक नाही. यासाठी जेष्ठ नागरिकांचे वय ६० वर्ष पूर्ण असावे, कोणत्याही अभ्यासक्रमातील पदव्युत्तर परीक्षेमध्ये किमान ५० टक्के गुण असावेत आणि ज्या विषयामध्ये पीएच.डी. करावयाची आहे त्या क्षेत्रातील किमान १५ वर्षाचा अनुभव असल्यास पेट मधून सूट देण्यात येत असते.

शिवाय नव्यानेच घेण्यात आलेल्या निर्णयानुसार जेष्ठ नागरिकांना पीएच.डी. करत असतांना जी कोर्सवर्क ची परीक्षा देणे आवश्यक होते. त्यामध्ये आता सूट देण्यात आलेली आहे. यापुढे जेष्ठ नागरिकांना कोर्सवर्क ची परीक्षा देण्याची आवश्यकता नाही.  जेष्ठ नागरिकांच्या पाठीशी असलेला अनुभव हा समाज उपयोगी व्हावा, प्रबंधाद्वारे समाजाला त्याचा उपयोग व्हावा असा विशाल दृष्टीकोन समोर ठेवून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या पुढाकाराने विद्यापारीषदेच्या बैठकीमध्ये सदर निर्णय घेण्यात आलेला आहे. 

‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये महर्षि वाल्मिकी यांची जयंती साजरी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये दि. २० ऑक्टोबर रोजी महर्षि वाल्मिकी यांची जयंती (तिथीनुसार) साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जागेन्द्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, उद्धव हंबर्डे, केशव गव्हाळे, श्याम डाकोरे, रामचंद्र शंबोले, विलास साळवे, विठ्ठल नवले, सुधाकर शिंदे, त्रिंबक आव्हाड, अभय जोशी, रामदास खोकले, प्रमोद हंबर्डे, सुधाकर नागरे, बबन हिंगे यांच्यासह शिक्षक, अधिकारी व कर्मचारी इत्यादींनी (कोव्हीड-१९) नियमाचे पालन करून महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!