Home निधन वार्ता श्रीमती उषा वेदव्यास मुदगलकर यांचे निधन -NNL

श्रीमती उषा वेदव्यास मुदगलकर यांचे निधन -NNL

by NNL ऑनलाईन

नांदेड| येथील विस्तारीत काबरानगरमधील ज्येष्ठ नागरिक श्रीमती उषा वेदव्यास मुदगलकर (७१) यांचे सकाळी ११ वाजता र्हदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

विस्तारीत काबरानगर येथील ज्येष्ठ नागरिक व अत्यंत मनमिळावू व्यक्तीमत्व असलेल्या श्रीमती उषा वेदव्यास मुदगलकर यांचे आज सकाळी ११ वाजता खासगी रुग्णालयात र्हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विशेष म्हणजे काल त्यांचा वाढदिवस होता. मुदगलकर कुटुंबियांनी त्यांचा वाढदिवस नुकताच साजरा केला होता. आज सकाळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

र्हदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज सकाळी ११ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात वासुदेव वेदव्यास मुदगलकर, अशोक मुदगलकर, अरुण मुदगलकर अशी तीन मुले, सूना, चार नातू, एक नात असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी नऊ वाजता गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या अकाली निधनाबद्दल परिवारात व परिसरातील मित्रमंडळीत व नातेवाईकात हळहळ व्यक्त होत आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!