Home खास न्यूज प्रा.सरकुंडे लिखित ‘तहबंदी’ कवितासंग्रहाचे प्रकाशन साहित्यिक, सामाजिक व विविध स्तरातून स्वागत -NNL

प्रा.सरकुंडे लिखित ‘तहबंदी’ कवितासंग्रहाचे प्रकाशन साहित्यिक, सामाजिक व विविध स्तरातून स्वागत -NNL

by NNL ऑनलाईन

नांदेड। महाराष्ट्रातील प्रख्यात साहित्यिक, विचारवंत तथा आंबेडकरवादी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते प्रा.माधव सरकुंडे यांचा समिक्षा प्रकाशन पंढरपूर ‘तहबंदी’ हा सातवा कवितासंग्रह यवतमाळ येथे मान्यवरांच्या हस्ते नुकताच प्रकाशित झाला असून साहित्य क्षेत्रात या कविता संग्रहाचे समाजातील विविध स्तरातून स्वागत होत आहे. यापूर्वी प्रा.सरकुंडे यांची ‘मनोगत’, ‘रान पाखरांची संसद’, ‘ब्लॅक इझ ब्युटीफुल’, ‘मी तोडले तुरुंगाचे दार’, ‘चेहरा हरवलेली माणसं’, ‘माझा दम घोटतोय’ आदी कवितासंग्रह प्रकाशित आहेत.

यवतमाळ येथील प्रख्यात प्रा.सरकुंडे यांनी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिले असून त्यांचे साहित्य देश विदेशातील अनेक विद्यापीठातील अभ्यासक्रमात आहे. त्याचबरोबर इंग्लंड व अमेरिका येथील वेबसाइटवर शेकडो कविता व लेखही प्रसिद्ध झाले आहेत. ‘वाडा’ ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांची ‘सर्वा’, ‘ताडमं’ ही कथासंग्रह प्रकाशित आहेत.’सल’, ‘आदिवासी अस्मितेचा शोध’ आदी वैचारिक ग्रंथाचे लेखनही केले आहे. याशिवाय ‘धनगर आदिवासी नाहीत- दाखले आणि पुरावे’ या संशोधनपर ग्रंथाचे लेखन सुद्धा प्रा.सरकुंडे यांनी केलेले आहे.

साहित्यक्षेत्रात नव्याने ‘तहबंदी’ हा कवितासंग्रह लिहिल्याबद्दल लक्ष्मण कुरुडे, गंगाधर वानोळे, शंकर बरगे,दादाराव टारपे,जयवंत वानोळे, प्रा.डॉ.एस.पी.ढोले, के.के. वानोळे, एकनाथ बुरकुले, उपसभापती शंकर मेंडके, संतोष तायवाडे, डॉ. बळीराम भुरके, संतोष डवरे, ज्ञानेश्वर भडंगे,संजय माझळकर, रामदास डवरे, प्रा.डॉ. कमल फोले, जयराम ढोले,संजय सिडाम, धनराज सोनटक्के, चंपतराव मेंडके,यशवंतराव वानोळे, शिवाजी पोतरे, बालाजी फोले, निर्गुण लोखंडे,गजानन आखरे, रामदास आम्ले, रामेश्वर डुडूळे,सखाराम लोखंडे आदींनी कवी प्रा.सरकुंडे यांचे अभिनंदन केले.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!