Home लोहा अल्फा इंटरप्रायजेस नांदेडच्या गैर व्यवहाराची चौकशी करून परवाना रद्द करा – माधव पाटील बोरगावकर -NNL

अल्फा इंटरप्रायजेस नांदेडच्या गैर व्यवहाराची चौकशी करून परवाना रद्द करा – माधव पाटील बोरगावकर -NNL

by NNL ऑनलाईन

लोहा| अल्फा इंटरप्रायजेस नांदेडच्या महावितरण मधील अनियमितता व गैर व्यवहाराची चौकशी करून त्यांचा परवाना तात्काळ रद्द करावा अशी मागणी भाजपाचे लोहा तालुका प्रसिध्दी प्रमुख माधव पाटील गायकवाड बोरगावकर यांनी मुख्य अभियंता महावितरण नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पुढे निवेदनात असे नमूद केले की,मंडळ कार्यालयात नांदेड ग्रामीण विभागात कनिष्ठ तंत्रज्ञ पुरविण्यासाठी दि.३ जून २०२१ रोजी अधीक्षक अभियंता यांनी त्यांना परवाना दिला. सदर ठेकेदाराने परवान्यातील अटी व नियमांचे उल्लंघन केले आहे.ठेकेदाराने कामगारांची शैक्षणिक पडताळणी केली नाही. कामगारांना नियुक्तीचे पत्र दिले नाही. विलंबाने वेतन करणे. कामगारांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये करणे बंधनकारक होते पण मर्जीतील पतसंस्थेत कामगाराचे वेतन अदा केल्याचे दाखवितात कामगारांकडून कोऱ्या चेकबुक वर सह्या घेतल्या जातात.

पतसंस्थेत १७ ते २० हजार रुपये जमा करतात व जवळील व्यक्तिकडून ती रक्कम उचलून कामगारांना प्रत्यक्ष ७ हजार ५०० रूपये मोबाईलद्वारे पाठवितात सदर ठेकेदार अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत आहे. त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केला आहे. तेव्हा अल्फा इंटरप्रायजेस नांदेड यांच्या अनियमितता व गैर व्यवहाराची चौकशी करून त्यांचा परवाना तात्काळ रद्द करावा अशी मागणी मुख अभियंता म.रा.वि.महावितरणचे मुख्य अभियंता यांच्याकडे माधव पाटील गायकवाड यांनी केली आहे. अन्यथा आमरण उपोषण करू असे नमूद केले आहे

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!