Home व्हिडीओ दिव्यांग बांधवाना अंत्योदय योजनेत समाविष्ठ करून ५ टक्के निधीचे तात्काळ वाटप करा -NNL

दिव्यांग बांधवाना अंत्योदय योजनेत समाविष्ठ करून ५ टक्के निधीचे तात्काळ वाटप करा -NNL

मागणीसाठी हिमायतनगर तहसिलसमोर आमरण उपोषण सुरु

by NNL ऑनलाईन

हिमायतनगर| तालुक्यातील विविध ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या दिव्यांग बांधवाना शासनाच्या अंत्योदय योजनेत समाविष्ठ करून त्यांना ग्रामपंचायतीच्या ५ टक्के निधीचे तात्काळ वितरण करण्यात यावे यासह इतर मागण्यासाठी हिमायतनगर येथील तहसील कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषण सुरु केले आहे.

हिमायतनगर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीने दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीचे वितरण केले नाही. त्यामुले दिव्यांग बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ५ टक्के निधीची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीत दिव्यांगांचा ५ टक्के निधी पडून आहे. अश्या ग्रामपंचायतीवर तात्काळ कडक कार्यवाही करण्यात यावी. नगरपालिका क्षेत्रात ५ टक्के निधी खर्च करण्यास जानीवीपुर्वक टाळाटाळ चालविली जात आहे. तसेच मागील ४ ते ५ महिन्यापासून श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळाला नसल्याने त्या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

या मागण्या मान्य करून तात्काळ गोरगरिब दिव्यांगांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळावा म्हणून आजपासून कुटुंबासह आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात गजानन मिराशे, सादिक पिंजारी, पांडुरंग हुंबे, कोंडबा शिरले आदींचा समावेष आहे. या उपोषण अनेकांनी पाठिंबा दर्शविला असून, ज्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी ५ टक्के निधीच्या वितरणात टाळाटाळ केली त्यांच्यावर कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा उपोषणकर्त्यानी पत्रकारांसमोर व्यक्त केली आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!