Home क्राईम विनापरवाना फटाक्यासह सात लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त -NNL

विनापरवाना फटाक्यासह सात लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त -NNL

by NNL ऑनलाईन

हिंगोली, दिनेश मुधोळ| वसमत तालुक्यातील हट्टा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या वसमत ते परभणी रस्त्यावर चिखली पाटी जवळ विनापरवाना फटाके बाळगल्या प्रकरणी फटाक्यांसह सात लाख ५६ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल हट्टा पोलिसांनी गुरुवारी जप्त करून एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत ते परभणी मार्गावर चिखली पाटीजवळ बुधवार ता. २० सायंकाळी साडेसहा वाजता वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे फटाके ज्याची किमंत तीन लाख ५६ हजार ७२० रुपयेकिमंतीचे फटाके टेम्पो क्रमांक एम एच २२ एम एन २५६० त्याची किमंत चार लाख असा एकुण सात लाख ५६ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल टेम्पोच्या पाठीमागील भागात विनापरवाना फटाक्यांची वाहतूक करताना सुरक्षेची उपाययोजना न करता मानवी जिवीतास धोका निर्माण होईल.

अशा रितीने फटाके बाळगून निश्काळजी पणे कृत्य केल्या प्रकरणी पोलिस कर्मचारी अरविंद गजभार यांनी गुरुवारी हट्टा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक रामचंद गु़गे रा. एंरडेश्वर ता. पुर्णा जि. परभणी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करुन फटाक्यांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!