Home करियर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश -NNL

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश -NNL

by NNL ऑनलाईन

नांदेड| महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 30 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्ह्यातील 57 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी 10 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत दोन सत्रात होणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळवले आहे.

या परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

 

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!