Home नांदेड मिशन कवचकुंडल अंतर्गत वाका उपकेंद्र येथे विशेष लसीकरण मोहिम संपन्न -NNL

मिशन कवचकुंडल अंतर्गत वाका उपकेंद्र येथे विशेष लसीकरण मोहिम संपन्न -NNL

by NNL ऑनलाईन

मारतळा। कोविड-१९ बाबत जिल्ह्यातील नागरिकांनी बाळगलेली दक्षता, आरोग्य विभागाने घेतलेली तत्परता आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी नियोजनामुळे कोरोनाचा प्रसार मर्यादित ठेवण्यास यश मिळाले आहे. तथापि अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नसून जिल्ह्यातील कोणत्याही नागरीकांची यात जीवत हानी होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहिम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. हे लसीकरण नांदेड जिल्ह्यातील आदिवासी पाड्यापासून तांड्यांपर्यंत ते शहरापासून महानगरापर्यंत प्रभावी करण्याच्या दृष्टिने दिनांक २१ ऑक्टोंबर रोजीच्या सकाळी ०८ पासून ते २४ तारखेच्या सकाळी १० वाजेपर्यंत पर्यंत अभूतपूर्व अशी ७५ तासांची विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासह या लसीकरण मोहिमेत स्वयंमस्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी नागरीकांना केले आहे.

या विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली असून यासाठी लागणारे अत्यावश्यक मनुष्यबळाचेही नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या मदतीसाठी महसूल विभाग, पंचायत समिती, बालविकास विभाग, शिक्षण विभाग आदी विभागांचेही सहकार्य घेतले जात आहे. ही मोहिम तीन शिफ्टमध्ये राबविली जात आहे. लोहा तालुका आरोग्य अधिकारी आणि कापशी बु. येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. आर.के.मुनेश्वर यांच्या मार्गदर्शकखाली ७५ तासांचे हे विशेष लसीकरण सत्र यशस्वी करण्यासाठी सिद्ध झाले आहे.

याचबरोबर या मोहिमेत स्थानिक राशन दुकानदार सहभागी होते.ग्रामीण पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक यांच्या सक्रिय सहभाग उत्साही वातावरणात लसीकरण आज घेण्यात आले यावेळी लसीकरणाचे योग्य नियोजन उपकेंद्र वाका येथील आरोग्य सेविका श्रीमती सपना टोमके,आरोग्य सेवक श्री.ए. डी. पारधे यांनी लाभार्थ्यांना कोविड लस देऊन ऑनलाईन नोंदणी केली जात आहे दिनांक २१ ऑक्टोबर रोजी १२१ लाभार्थ्यांना पहिला आणि दुसरा डोस देण्यासाठी प्रयत्न केला आहे.या प्रसंगी उपस्थित रयत सेवाभावी संस्थेचे संचालक प्रा.इरवंत सुर्यकार, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष माधव हंबर्डे, यांच्या मदतीला राशन दुकानदार श्री.चक्रधर हंबर्डे ,अंगणवाडी कार्यकर्ते सर्वश्री श्रीमती सविता वाघमारे ,ललिता कोलते,आम्रपाली आढाव ,मदतनीस श्रीमती सुनीता हंबर्डे, सत्यभामा हंबर्डे,आशाबाई झंपलवाड,आशा वर्कर श्रीमती सुनीता हंबर्डे, रंजना वन्ने,पार्ट टाईम कर्मचारी श्रीमती कमलबाई कौठवाड,लाभार्थी विकास हंबर्डे यांची उपस्थिती होती.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!