Home मनोरंजन 50 टक्के क्षमतेने नाट्यगृह उघडणार असतील तर सर्व निर्मात्यांना पण अर्धे भाडे माफ करावे…. संजय आल्हाट -NNL

50 टक्के क्षमतेने नाट्यगृह उघडणार असतील तर सर्व निर्मात्यांना पण अर्धे भाडे माफ करावे…. संजय आल्हाट -NNL

by NNL ऑनलाईन

पुणे| महाराष्ट्र सरकारने दि.22 ऑक्टोबर पासून सर्व नाट्यगृह व चित्रपट गृह 50 टक्के आसन क्षमतेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचे स्वागत करत आज लोक जनशक्ती पार्टी व विकल्प गृप च्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येरवडा, पुणे या ठिकाणी रंगमंचाचे पूजन करण्यात आले

लोक जनशक्ती पार्टी चे पुणे शहर व जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट व गायीका व महीला आघाडी च्या सरचिटणीस कल्पना जगताप यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच नटराजाचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात नांदी व गण गाऊन करण्यात आली त्यानंतर नाट्यगृहातील सर्व कर्मचारी बांधवाना सन्मानित करण्यात आले.

सदर प्रसंगी बोलताना संजय आल्हाट म्हणाले की लोक जनशक्ती पार्टी ही नेहमीच कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, दोन वर्षांत कलाकारांची अवस्था खूप बिकट झाली आहे. सरकारनं जी मदतीची घोषणा केली आहे त्याची लवकर पुर्तता करावी तसेच 50 टक्के आसनक्षमतेत नाट्यगृह सुरू करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो निर्मात्यांना न परवडणारा आहे म्हणून सर्व निर्मात्यांना नाट्यगृहाच्या भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात यावी,सर्व लोककलांचे जतन व संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेऊन लवकरच लोककला प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असून राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चिराग पासवान यांची भेट घेऊन लोक कलावंतासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले व सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या.

सदर प्रसंगी सिने अभिनेते प्रशांत बोगम, चित्रपट निर्माते बाळासाहेब बांगर, शिवा बागुल, अभिनेते श्रीकृष्ण भिंगारे, पुणे शहर सरचिटणीस के सी पवार, दादा चव्हाण, वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संतोष पिल्ले, अप्पा नाकाडे,सतीश धेंडे, आनंद जेधे, जीवन शिंदे इत्यादी कलावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिने अभिनेते प्रशांत बोगम यांनी केले,शेवटी उपस्थित सर्वांचे आभार विकल्प गृपचे विनोद धिवार यांनी मानले तर आयोजक सुप्रसिद्ध गायीका,लोक जन शक्ती पार्टी महीला आघाडी च्या सरचिटणीस कल्पना जगताप यांनी लवकरच सर्व नवीन कलाकारांना घेऊन सुंदर कार्यक्रम करण्याचे आश्वासन दिले.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!