Home लोहा अपघातग्रस्त राठोड कुटुंबियांचे चिखलीकरांकडून सांत्वन -NNL

अपघातग्रस्त राठोड कुटुंबियांचे चिखलीकरांकडून सांत्वन -NNL

by NNL ऑनलाईन

नांदेड| तालुक्यातील वडगाव तांडा येथील संतोष राठोड यांचे अपघाती निधन झाले तो घरातील कर्ता होता. त्याच्या कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले .निवडणुकीची धामधूम बाजूला सारत जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कन्या प्राणिताताई देवरे-चिखलीकर यांनी वडगाव तांडा येथे भेट दिली.अपघातग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली त्यांचे सांत्वन केले व आर्थिक मदत केली.या प्रसंगी प्राणिताताई यांची अश्रू अनावर झाले.

तालुक्यातील वडगाव तांडा येथील संतोष राठोड यांच अपघाती निधन झाले. त्याच्या घरी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशउपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी भेट दिली.मयत संतोष याची आई दगडूबाई यांचे सांत्वन केले. तो घरातील कर्ता व एकुलता एक मुलगा होता ,त्यामुळे आई व कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. प्राणिताताई या भेटण्यासाठी गेल्या तेव्हा आई व कुटुंबीय याना रडू आवरता आले नाहि. प्राणिताताई यांनाही अश्रू अनावर झाले.

त्यांनी दगडूबाई राठोड यांना आर्थिक मदत केली. यावेळी लोहा पंचायत समितीचे सभापती आनंदराव पाटील शिंदे, माजी सभापती शंकरराव पाटील ढगे , रंगराव पाटील लोंढे, दापशेडचे सरपंच वीरभद्र राजुरे, टाकळगावचे सरपंच भिमराव पाटील लामदाडे ,वडगावचे सरपंच बंडू पाटील, प्रभू थेटे,मेहरबान जाधव, वसंत राठोड, उपसरपंच ताराबाई राठोड आदी उपस्थित होते.पोट निवडणुकीची रणधुमाळी बाजूला सारून प्राणिताताई वडगाव तांडा येथे राठोड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाल्या .

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!