Home लोहा विद्यार्थ्यानो अडचण अडथळा नसते तर ती प्रेरणा असते-पोलीस निरीक्षक तांबे -NNL

विद्यार्थ्यानो अडचण अडथळा नसते तर ती प्रेरणा असते-पोलीस निरीक्षक तांबे -NNL

by NNL ऑनलाईन

लोहा| विद्यार्थीदशेत अनेक अडचणी असतात.त्याला घाबरून न जाता त्यावर मात केली पाहिजे. जीवनात येणाऱ्या अडचणी या आपल्या मार्गातील अडथळा नसतो तर ती एक यशाकडे नेणारी प्रेरणा असते असे मार्गदर्शन लोह्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी केले.

लोहा शहरातील शिवकल्याण नगरातील सुविधा काँप्लेक्स मधील जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्र येथे विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अभ्यासिकेच्या वतीने क्रीडा शिक्षक दिलीप काहळेकर, पत्रकार बालाजी ढवळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक काशीनाथ शिरसिकर, पत्रकार हरिहर धुतमल, संचालक प्रवीण धुतमल, व्यवस्थापक बालाजी धनसडे याची उपस्थिती होती

पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी शालेय जीवनात शिक्षण घेताना किती कष्ट घ्यावे लागले याचे अनुभव सांगताना त्यांनी प्रत्येकाच्या जीवनात अडचणी येतात. म्हणून आपण आपल्या ध्येया पासून विचलित होऊ नये. अडचण ही आपल्या यशस्वी जीवनात कधीच अडथळा नसतो तर ती एक प्रेरणा असते. असा उपदेश करताना महाविद्यालयीन जीवनात स्पर्धा परिक्षेकडे आपण कसे वळलो याचे त्यांनी सोदाहरण दिले. ग्रामीण भागात गुणवत्ता अधिकची असते .तुम्ही अपयशाने खचून न जाता नवीन उमेद, जिद्द, मनाशी ठेवून मन विचलित होऊ न देता अभ्यास करा यश मिळावा असे मार्गदर्शन श्री तांबे यांनी विद्यार्थ्यांना केले.हरिहर धुतमल यांनी प्रास्ताविकात अभ्यासिकेची भूमिका विशद केली. मार्गदर्शन झाल्या नंतर विद्यार्थ्यांनी अडचणी व प्रश्न विचारले.त्याचे पोलीस निरीक्षक तांबे यांनी निराकरण केले.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!