Home नांदेड संयुक्त राष्ट्रसंघदिनी संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्रध्वजा समवेत उभारावा -NNL

संयुक्त राष्ट्रसंघदिनी संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्रध्वजा समवेत उभारावा -NNL

by NNL ऑनलाईन

नांदेड| संयुक्त राष्ट्रसंघ दिन 24 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्र ध्वजासमवेत उभारण्याबाबत शासनाने परिपत्रकानुसार निर्देश दिले आहेत.

ज्या शासकीय कार्यालयात दररोज राष्ट्रध्वज उभारण्यात येतो त्या कार्यालयावर 24 ऑक्टोंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघदिनी संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज भारतीय ध्वजसंहिता 2002 च्या परिपत्रकानुसार राष्ट्रध्वजाच्या बरोबर उभारण्यात यावा. संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्रध्वजाच्या कोणत्याही बाजुला फडकविता येतो. सामान्यत: ध्वज स्तंभाच्यासमोर उभ्या असलेल्या प्रेक्षकांच्या दृष्टीने त्यांच्या अगदी डावीकडे राष्ट्रध्वज असावा, असेही उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी कळविले आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!