Home नांदेड कोवीड लसीकरणाला जिल्ह्यात प्रतिसाद; 75 तासाची मोहीम गतिमान -NNL

कोवीड लसीकरणाला जिल्ह्यात प्रतिसाद; 75 तासाची मोहीम गतिमान -NNL

by NNL ऑनलाईन

नांदेड| कोवीड-19 च्या आजारासाठी लसीकरण अंमलबजावणी जिल्ह्यात व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने 75 तासाची ही कोवीड लसीकरण मोहीम 21 ऑक्टोबर पासून जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. जिल्‍हा आरोग्‍य यंत्रणा, महसूलसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी क्षेत्रीय भेटी करुन लसीकरण मोहिम यशस्‍वी करण्‍यासाठी पुढाकार घेत आहेत. या मोहिमेत नागरिकांनी पुढे येऊन कोवीडची लस घ्‍यावी असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य यंत्रणा लसीकरणाच्या 72 तासाच्‍या मोहिमेत सक्रिय झाली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याबरोबरच नागरी भागात ही लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा, महाविद्यालय, महानगरपालिका, नगरपंचायत, सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे, यात्रेचे ठिकाण, चित्रपट गृह नाट्यगृह, आठवडी बाजार, मुख्य बाजार, तालुकास्तरावर मार्केट कमिटी आदी ठिकाणी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. ग्रामीण भागात सरासरी 52 टक्के लसीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातून 13 लक्ष लाभार्थ्यांनी कोवीडचा पहिला डोस घेतला आहे. 75 तासाची लसीकरण मोहिम रविवार दिनांक 25 ऑक्‍टोबर दुपारी बारा वाजेपर्यंत चालणार आहे. त्‍यानंतर लसीकरणासाठी कवचकुंडल अभियान येत्‍या 2 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.

कोवीड लसीकरणासाठी राज्य शासनाच्या वतीने मिशन कवच-कुंडल आपल्या जिल्ह्यात सुरू असून अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 तासाचे विशेष लसीकरण मोहिम जिल्ह्यात सुरू करण्‍यात आली आहे. येत्या 25 ऑक्‍टोबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत 72 तासाची विशेष लसीकरण मोहिम चालणार आहे. कोवीडला आळा घालण्‍यासाठी 18 वर्ष व त्‍यापुढील सर्व नागरिकांनी कोवीडची लस घ्‍यावी असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.

कोविड लसिकरणासाठी जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने 21 ऑक्‍टोबर पासून लसिकरणाची विशेष मोहिम हाती घेण्‍यात आली आहे. यात पहिल्‍या दिवशी ग्रामीण भागातील 21 हजार 947 लाभार्थ्‍यांना लस घेतली आहे. यात पहिला डोस घेणारे 16 हजार 84 तर दुसरा डोस घेणारे 5 हजार 863 लाभार्थ्‍यांचा समावेश आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!