Home नवीन नांदेड कवच कुंडल मशिन अंतर्गत तुप्पा आरोग्य केंद्राच्या वतीने लसिकरण अभियान -NNL

कवच कुंडल मशिन अंतर्गत तुप्पा आरोग्य केंद्राच्या वतीने लसिकरण अभियान -NNL

किक्की गावात पहिला डोस पुर्ण..

by NNL ऑनलाईन

नविन नांदेड| जिल्हा प्रशासनान विभागाच्या कवच कुंडल योजने अंतर्गत ७५ तास रात्र दिवस अभियान अंतर्गत तुप्पा आरोग्य केंद्राच्या १२ गावात लसिकरण मिशन मोहीम राबविण्यात येत असल्याने हे आरोग्य केंद्र १०० टक्के लसिकरण टप्पा पुर्ण करत असुन आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या किक्की गावाने पहिला डोस १०० टक्के पुर्ण केला आहे,या गावातील परिचारीका ,आशा वर्कर्स व अंगणवाडी मदतनीस,सेविका यांचा सह वैधकिय अधिकारी यांच्या सह कर्मचारी यांच्ये आरोग्य विभागाच्या वरीष्ठ अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

कवच कुंडल योजने अंतर्गत मिशन तुप्पा आरोग्य केंद्राच्या वतीने २१ आक्टोबर सकाळी ८ पासून ते २४ तारखेच्या सकाळी ११ पर्यंत सलग ७५ तास रात्र दिवस लसिकरण अभियान ला सुरूवात करण्यात आली, आरोग्य केंद्र अंतर्गत १२ गावातील लोकसंख्या ४७,७९२ असुन या पुर्वी ६० टक्के लसिकरण पुर्ण केले असून मिशन कवच कुंडल अभियान मध्ये महिला बाल विकास प्रकल्प, ग्रामपंचायत कार्यालय,शिक्षण संस्था व जिल्हा परिषद शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यासह विविध यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत.

त्यामुळे हे मीशिन यशस्वी होत असुन आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी राठोड, डॉ.मुदीराज व आरोग्य कर्मचारी, परिचारिका ,आशा वर्कर्स, अंगणवाडी मदतनीस, सेविका यांचा सह कर्मचारी हे अभियान यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत. २२ आक्टोबर रोजी धनेगाव येथे लसिकरण अंतर्गत गट विकास अधिकारी डॉ.तोटावार, तालुका शिक्षणधिकारी आडे, तालुका आरोग्य अधिकारी प्रविण मुंढे, यांच्या सह जिल्हा स्तरावरील आरोग्य अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली व लसिकरण वाढविण्यासाठी सुचना केल्या.

आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या किक्की या गावात पहिला लसिकरण डोस १०० टक्के पुर्ण झाल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी राठोड, परिचारिका श्रीमती मुमताज शेख,श्रीमती सुरकटवार, आरोग्य कर्मचारी गिझे, हंबर्डे व आशा वर्कर्स यांच्ये आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे, बाभुळगाव येथील कोवीड लसिकरण केद्रालाही आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी खेडेकर,गुजरवाड,संजय केंद्रे प्रमुख यांनी भेट देऊन पाहणी केली व लसिकरण बाबत आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. या कवच कुंडल अभियान मिशन मुळे हे आरोग्य केंद्र १०० टक्के लसिकरण कडे वाटचाल करीत आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!