Home क्राईम रेतीची अवैद्य वाहतूक करणारे टिप्पर पकडले-NNL

रेतीची अवैद्य वाहतूक करणारे टिप्पर पकडले-NNL

by NNL ऑनलाईन

नायगाव। आज दिनांक 22- 10- 2019 रोजी बीट जमादार पोले साहेब व पोलीस नाईक भार्गव सुवर्णकार यांना गुप्त बातमीदार माहिती मिळाली की एक टिप्पर रेतीची वाहतूक करीत मिळाल्याने सपोनि पुरी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार मौ.सोमठाणा येथे लपून बसून सकाळी 06.30 वा. टिप्पर क्रमांक एम एच 24 जे 61 68 थांबून पाहणी करता काळी रेती मिळून आल्याने त्याचे रॉयल्टी नसल्याने पोलीस स्टेशन कुंटूर येथे लावण्यात आले.

 

सदरची माहिती तहसील कार्यालय नायगाव यांना देऊन सदर वाहन चालक गोपीनाथ संभाजी भुरे राहणार धनज बु. तालुका लोहा यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 222/ 2019 कलम 379 34 भा द वि सह कलम 48 ‌‌(७)(८) गौण खनिज अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन ब्रास रेती किमती 12600/- रुपये व टिप्पर ताब्यात घेऊन वाहन चालकास अटक करण्यात आले आहे. मा.सपोनि पुरी साहेबांच्या आदेशान्वये पुढील तपास पोहेकाँ पोले हे करीत आहेत.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!