Home कंधार नागरिकांनी कोरोनाची लस घेऊन प्रशासनाला सहकार्य करा – गटविकास अधिकारी -NNL

नागरिकांनी कोरोनाची लस घेऊन प्रशासनाला सहकार्य करा – गटविकास अधिकारी -NNL

by NNL ऑनलाईन

उस्माननगर, माणिक भिसे। गावातील वार्डा-वार्डाची जबाबदारी घेवून एकोप्याने लसीकरण गतीने पूर्ण करुन नागरिकांनी कोरोनाची लस घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे ” असे आवाहन कंधार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर मांजरमकर यांनी येथील जामा मशीद शेजारील काजी साहब यांच्या कार्यालयात आयोजित जनजागृती बैठकीत शुक्रवारी दि. २२ रोजी व्यक्त केले.

यावेळी सभापती लक्ष्मीबाई घोरबांड, सरपंच गयाबाई घोरबांड, विस्तार अधिकारी तिरुपती गुट्टे, बालाजी कोटेवाड, ग्रामसेवक डी. ए. शिंदे, तलाठी सिमा कदम, शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर, रशिदखान पठाण, अमिन शहा, गंगाधर भिसे,संभाजी काळम, मुखीद मौलाना, अशोक काळम, आदी उपस्थित होते.  यावेळी गावात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर मांजरमकर यांनी भेट दिली. यावेळी गावातील शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!