Home खास न्यूज प्रत्येकांना मिळेल आपला न्याय हक्क, विधी सेवा देईल मोफत-अॅड. काझी विलायत अली-NNL

प्रत्येकांना मिळेल आपला न्याय हक्क, विधी सेवा देईल मोफत-अॅड. काझी विलायत अली-NNL

by NNL ऑनलाईन

देगलूर। आझादी का अमृत महोत्सव’ या निमित्त ‘पैन इंडीया’ मार्फत देगलूर दिवाणी व फौजदारी न्यायालय देगलूर च्या वतीने तालुक्यात कायदेविषयक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. हणेगाव सर्कल मध्ये अॅड. काझी विलायत अली याच्या अध्यक्षतेखाली एक टिम नेमण्यात आली असुन, ही टिम देगलूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात जावून वाडी,तांडे, वसाहती,गावोगावी जावून कायदेविषयक जनजागृती अभियान यशस्वीपणे पुर्ण केले आहे. या वेळी गोगले गोविंद तांडा, मानुर, हिप्परगा, बेम्बरा, अशा महाराष्ट्रातील अगदी शेवटच्या भागात जावून कायदेविषयक जनजागृती केली.

यावेळी पुरोगामी अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. काझी विलायत अली यांनी गावकरी,ग्रामस्थ, महिला व शाळेतील मुलामुलींना कायदेविषयक सविस्तर माहीती देतांना निर्भया व कोपर्डीसारखे प्रकार होऊ नयेत यासाठी गावातील महिला व युवतींमध्ये न्याय, हक्क व अधिकारांबाबत जनजागृतीसाठी जिल्हा विधीसेवा प्राधिकरण जनजागृती उपक्रमांचे आयोजन करीत आहे’,असे ते म्हणाले.’जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रयत्नामुळे जीवनातील महत्त्वाचे कायदेविषयक ज्ञान विद्यार्थिनींना मिळाले आहे. या जनजागृतीमुळे विद्यार्थिनी कायद्याविषयी सजक झाल्या असून उद्याचे आदर्श नागरिक होण्यासाठी या ज्ञानाचा त्यांना फायदा होईल.

अॅड. देवकत्ते यांनी कौटुंबिक हिंसाचार,या बद्दल सविस्तर पणे माहीती दिली. तर अॅड. तम्मलूरकर यांनी प्रास्ताविक मांडले. संगीत शिक्षक पंचशिल सोनकांबळे यांनी आपल्या गीतगायनातुन हुंडाबळी,कौटुंबिक हिंसाचार दारूबंदी,वयोवृद्धांना होणारे ञास याची व्यथा गीतगायनातून व्यक्त करीत कायदेविषयक जनजागृती केली. यावेळी प्रत्येकगावी गावकरी, ग्रामस्थ,महिला,शाळेतील मुलंमुली, शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!