श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। बसस्थानक परीसरातून एका भाविकाचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना दि.२५ एप्रिल रोजी घडली होती सदरील मोबाइल चोरीचा एक तासात शोध लावण्यास माहूर पोलीसाना यश आले असून आरोपिस अटक करण्यात आली आहे.
वाळुज छ.संभाजीनगर येथील भाविक संतोष उकळकर हे देव दर्शन करून गावा कडे जाण्या करीता दु.२.३० वा बस्थानक येथे आले होते त्यावेळी एक अज्ञात इसमाने मोबाईल हिसकावुन पळून गेल्याबाबत चि तक्रार पोलीस स्टेशन ला दिली त्यानुसार गुन्हा दाखल करून माहुर पोलीस स्टेशनचे पोनि डॉ. नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात सपोनि श्रीधर जगताप पो.ना. विजय आडे.बाबु जाधव. पो.कॉ. पवन राउत. ज्ञानेश्वर वेलदोडे.रविन्द्र इंगोले.चालक पांडुरंग गुरनुले यांनी तांत्रीक तपासाचे आधारे आरोपी अट्टल मोबाइल चोर मो.साबीर मो. इब्राहीम सौदागर वय ४५ वर्षे रा.शिवाजी चौक माहुर यास गुन्हा घडल्यापासुन अवघ्या एका तासात अटक केली.
त्याच्या ताब्यातून चोरलेला १४.०००/- रू किंमतीचा एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन हस्तगत केला. आरोपीला दि.२६ रोजी माहूरच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर केले असता न्यायधीश एस. एस. गाढवे यांनी एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे .अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे यांचे आदेशाने नांदेड जिल्हयामध्ये गुन्हेगारांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई अटक करण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डांगरे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांनी पोलीस स्टेशन माहुर हद्दीत होत असलेल्या मोबाईल चोरीच्या वाढत्या प्रमाणामुळे त्यांचेवर लक्ष ठेवुन शोध घेवुन अटक करण्याबाबत आदेशीत केले आहे.