भोकर। भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांची अश्लील चित्रफीत एका मराठी वॄतवाहिनीने प्रसारीत करताच महाराष्ट्रात जन सामान्यात संतापाची लाट उसळली असून त्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे.
भाजपा महिलांचा सन्मान करुच शकत नाही हे भाजपा सोलापुर, परभणी येथील नेत्यांनी केलेल्या कॄत्यावरुन दिसुन येते. त्यास भरीस भर म्हणून किरीट सोमय्या यांनी तर अश्लीलतेचा कळसच गाठला. अशा निच प्रवॄतीचा निषेध करण्यासाठी भोकर शिवसेनेच्या वतीने दिनांक १८ जुलै रोजी सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सतिष देशमुख, तालुका प्रमुख माधव वडगावकर, शहर प्रमुख पांडुरंग वर्षे वार, माजी जि.प.सदस्य सुनील चव्हाण,नंदु पाटील कवठेकर, मनोहर साखरे, मारोती पवार, संभाजी पोगरे,सोहम शेट्टी, नागेश पिटलेवाड,रमेश यशवंतकर, सुनील जाधव,दिपक मेटकर, जगदिश गडदे,किशन गायकवाड, अनिल बनसोडे, गज्जू मेटकर व्यंकटेश सोनवडे,, महिला आघाडी च्या आनंदाबाई चुनगुरवाड लक्ष्मण शितोळे,मोहन भाडेवाढ, सुरेश शेळके सुनिल नरवाडे,राम भुरे,पवन चुनगुरवाड यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.