हिमायतनगर। हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथे मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा चे आयोजन करून विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील क्रीडा विभागाचे क्रीडा संचालक डॉ. दिलीप माने यांच्या उपस्थित क्रीडा दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी पर्यावरण शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक आशिष दिवडे सर यांनी खेळाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले तसेच दुसरे व्याख्याते अर्थशास्त्र विभाग प्रमुख सहयोगी प्राध्यापक डॉ. डी. के. मगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की, विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्ती जोपासून विविध खेळ भावना व छंद जोपासून त्या करियर जडण घडणी मध्ये त्याचा उपयोग करून घ्यावा असे नमूद केले. याप्रसंगी कार्यालयीन मुख्य लिपिक श्री संदीप हरसुलकर सर उपस्थित होते तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.