अंकुश सुरेवाड यांची फौजदार पदावर निवड

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेकवेळा अपयश येतं मात्र जिद्द आणि मेहनातीच्या जोरावर अंकुश परशुराम सुरेवाड यांनी यश मिळवलं आहे. अंकुशने मागील चार वर्षा पासून राज्यसेवा परिक्षेची तयारी केली होती. नुकताच फौजदार पदाचा निकाल जाहीर झाला त्यात अंकुशने 26 वि रॅंक मिळवून घवघवीत यश मिळवलं आहे. अंकुशला यापूर्वी झालेल्या दोन परीक्षेत थोड्या गुणामुळे पोलीस उपनिरीक्षक पदापासून दूर राहावे लागलं होतं. अंकुशने मात्र जिद्द सिडली नाही पुन्हा 2017 मध्ये जाहीर झालेल्या फौजदार पदाच्या तयारीसाठी तो अभ्यासाला लागला. 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या मुख्य परीक्षेत अंकुशने यश संपादन केलं आहे. 8 मार्च 2019 रोजी फौजदार पदाचा अंतिम निकाल लागला त्यात अंकुश सुरेवाड यांनी एस टी सर्वसाधारण प्रवर्गातून सव्वीसावी रॅंक मिळवली आहे. या यशाबद्दल मित्र आणि नातेवाईकांकडून त्या शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

You may also like