प्र.संचालक डॉ.जगदीश कुलकर्णी यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

स्वारातीम विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्राचे

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्राचे प्र.संचालक डॉ.जगदीश नरहरराव कुलकर्णी यांना तिरूचिल्लापल्ली (तामिळनाडू) येथील रुला (रिसर्च अंडर लिटरर अक्सेस) या संस्थेने अवार्ड्स-२०१९ अंतर्गत उत्कृष्ट ग्रंथपाल हा पुरस्कार नुकताच प्रदान केला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मेडल, प्रमाणपत्र आणि संस्थेचे आजीवन सदस्यत्त्व असे आहे.

डॉ.जगदीश कुलकर्णी नांदेड जिल्ह्यातील हळदा (ता.कंधार) येथील असून ते मागील २४ वर्षापासून ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अहमदाबाद, औरंगाबाद, पुणे, उल्हासनगर, गंगाखेड याठिकाणी विविध पदावर काम केले आहे. १९९९ साली ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सहाय्यक ग्रंथपाल या पदावर रुजू झाले. आणि २०१२ पासून त्यांच्याकडे ज्ञानस्त्रोत केंद्राचा अतिरिक्त पदभार असून त्यांच्या कार्यकाळात ज्ञानस्त्रोत केंद्राने भरीव प्रगती केली आहे.

ज्ञानस्त्रोत केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने, प्र.संचालक डॉ.जगदीश कुलकर्णी यांना मिळालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचा शाल, श्रीफळ आणि ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.राजेश काळे, गणेश लाठकर, राजेश गवाळे, डॉ.अरुण हंबर्डे, सायलू नरोड, विठ्ठल मोरे, बाबू पोतदार, संदीप डहाळे, खाजामियॉ सिद्दिकी, मोहनसिंघ पुजारी, मोहनदास कांबळे, अच्युत पांचाळ, भीमराव कांबळे, मनोज टाक आदींची उपस्थिती होती.

त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, कुलसचिव डॉ.रमजान मुलाणी, वित्त व लेखाधिकारी डॉ.गोविंद कतलाकुटे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.रवि सरोदे यांच्यासह विद्यापीठ परिसरातील विविध संकुलाचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.

You may also like