टीसीएल इलेक्ट्रॉनिक्सची दिल्ली कॅपिटल्ससह हातमिळवणी

वैश्विक स्तरावरील दुसरा सर्वश्रेष्ठ टेलिव्हिजन ब्रॅंड आणि आघाडीची उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक कंपनी असलेल्याटीसीएल इलेक्ट्रॉनिक्सने दिल्ली कॅपिटल्सशी भागीदारीची जाहिरात केली आहे. ते इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल)च्या आगामी सीझनमध्ये या संघाचे प्रायोजक असतील. दिल्ली कॅपिटल्स हा आयपीएलच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. या भागीदारीचा एक भाग म्हणून टीसीएल आयपीएलच्या १२ व्या मोसमात दिल्लीच्या टी२० संघास प्रायोजित करेल. या भागिदारीतून

प्राप्तीकर कमी करण्याकरिता ‘एचआरए’ ठरेल उपयुक्त

(श्री. अर्चित गुप्ता, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, क्लिअरटॅक्स) घरभाडे भत्ता किंवा हाउस रेंट अलाउन्स (एचआरए) हा पगारदार व्यक्तींच्या पगाराचा अविभाज्य भाग आहे. एचआरए आणि मूळ वेतनात (बेसिक सॅलरी) फरक म्हणजे एचआरए अंशत: करपात्र आहे आणि ते कर्मचा-यावर अवलंबून आहे. काही विशिष्ट परिस्थितीत एचआरए तुमचे करपात्र उत्पन्न कमी करण्यासाठी व पर्यायाने प्राप्तीकर कमी करण्यासाठी उपयुक्त

कोळपे पाटील सोसायटीकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी संपर्क साधावा

आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांचे जनतेला आवाहन कोळपे पाटील सोसायटीकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी नांदेड येथे पोलीस अधिक्षक कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेत संपर्क साधून आपल्या फसवणूकीची माहिती द्यावी असे आवाहन आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांनी जनतेला केले आहे. कोळपे पाटील मल्टी स्टेट के्रडीट कोऑपर्रेटीव्ह सोसायटीने नांदेड जिल्ह्यात 16 विविध शाखा

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जंगलाला लागली आग

दि.१९ मार्च रोजी किनवट तालुक्यातील जलधरा येथील वनविकास महामंडळाच्या शेकडो एकरावरील जंगलात मागील तीन ते चार दिवसांपासून आग लागली असून या आगीमुळे लाखो रूपयांची वनसंपदा भस्मसात झाली आहे. महाराष्ट्रात मौल्यवान सागवान वृक्षासह, वनोषधींचे जंगल म्हणून याकडे पाहिले जाते. हे जंगल तीन ते चार हजार हेक्टरपर्यंत पसरले आहे. या जंगल परिसरातील झलकवाडी, नंदनवन, जलधरा, सेवादासनगर, मातरीमाथा,

ग्रामीण तंत्रनिकेतनने मनपा कराचे थकबाकी 9 लाख रुपये भरले

नांदेड-विष्णूपूरी रस्त्यावर असलेल्या ग्रामीण तंत्रनिकेतनकडे थकबाकी असलेले 9 लक्ष रुपये मालमत्ता कर आज महानगरपालिकेने वसुल केले. सिडको क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 6 च्या अंतर्गत येणारे ग्रामीण तंत्रनिकेत नांदेड यांच्याकडे 9 लाख रुपये मालमत्ताकर थकला होता. त्या संदर्भाने वसुल पथकातील उपायुक्त अजितपालसिंघ संधू, सहाय्यक आयुक्त कर सदाशिव पतंगे, पशु शल्य चिकित्सक डॉ. मोहम्मद रईसोद्दीन, क्षेत्रीय अधिकारी रावण

कलंबर सहकारी साखर कारखान्यात लागली आग ; जिवीत हानी नाही

येथुन जवळच असलेल्या मौजे कलांबर ता.कंधार येथील सहकारी कारखान्यातील भांडारग्रहाच्या पाठीमागील बाजूस दि.17 रोजी सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान अचानकपणे आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने जिवीत तसेच आर्थिक नुकसान झाले नसल्याचे संबंधितांकडून मिळालेल्या माहीतीनूसार समजते . सविस्तर व्रत असे की दि.17 रोजी रविवारी सकाळी साधारणता साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान बंद अवस्थेत असलेल्या

राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ठ कामाकडे अभियंत्याचे अक्षम्य दुर्लक्ष

आक्षेप घेणाऱ्या जनतेला गुत्तेदाराची अरेरावी कोट्यावधीच्या कामांची अल्पावधीतच वाट लागणार…! राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होऊन दोन वर्षं लोटली मात्र हिमायतनगर – इस्लापुरकडे जाणार्या महामार्गाच्या काम झालेच नाही. उलट या कामच दर्जा पूर्णतः खालावला असुन, ठेकेदारकावूडनं थरूर – मातुर पद्धतीने रस्ता करून शासन व जनतेच्या धूळफेक केली जात असल्याचा आरोप या रस्त्याच्या काठावरील गावकऱ्यातून केला जात

निवडणुकीतील आर्थिक व्यवहार पडताळणीत बँकिंग अधिकाऱ्यांची जबाबदारी महत्त्वाची – फरोग मुकादम

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या बँकिंग खात्यासंदर्भात पारदर्शीपणा व आर्थिक व्यवहाराची पडताळणी होण्यासाठी बँकिंग अधिकाऱ्यांची जबाबदारी महत्त्वाची आहे ,असे प्रतिपादन उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी केले. मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभाग व मुंबई शहर अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने आयोजित बँक अधिकारी वर्गाच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची बँक खाती,

क्विनटाइपने डिजिटल पोहोच वाढवण्यासाठी देशी कंपन्यांना सक्षम केले

डिजिटल सामग्री प्रकाशनाला सेवा देणारी भारताची आघाडीची कंपनी क्विनटाइप क्षेत्रीय भाषांत मजकूर तयार करणा-यांना आपला मजकूर इंटरनेटवर प्रकाशित करण्यासाठी एक डिव्हाईस-अॅग्नॉस्टिक्स, दर्जेदार इंटरफेसने सुसज्ज मंच पुरविते. त्याचे लक्ष्य आहे, या प्रकाशकांना स्मार्टफोनने सज्ज ५०० दशलक्ष लोकांच्या वाचकवर्गाच्या जवळ घेऊन जाणे. या बाबतीत अनुमान आहे की २०१२० मध्ये तेच मुख्य लक्षित वाचक असतील. भारतातील टियर २

सीआरपीफच्या वीरांसाठी पेटीएमने ४७ कोटी रु जमा केले

पेटीएम या भारताच्या सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट्स कंपनीने आज सीआरपीफ (CRPF) वाईव्ह्ज वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्ष श्रीमती मनू भटनागर यांना ४७ कोटी रूपयांचा धनादेश सुपूर्त केला. सीआरपीफच्या वीरांसाठी देण्यात आलेल्या योगदानातून ही रक्कम जमा झाली होती. १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीफ जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर या मंचावरून निधी जमा करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. १५ फेब्रुवारी ते