Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

निदर्यीपणे गोवंशाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही

तीन दिवसात दोन वाहने पकडून दिले गोवंशाना जीवदान हिमायतनगर तालुक्यातून तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या रस्त्याने गेल्या काही दिवसापासून वाहनातून गोवंश व मासाची वाहतूक होत आहे. याबाबत काही जागरूक गोप्रेमी युवकांच्या जागरूकतेमुळे गेल्या तीन दिवसात दोन वाहने पकडून धडाकेबाज कार्यवाही झाल्याने सर्व स्तरातून पोलीस प्रशासन व गोप्रेमी नागरिकांचे अभिनंदन केले जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि,

डांबर घोटाळ्यात अटकेत असलेल्या तिसऱ्या कंत्राटदाराला जामीन मंजूर

उच्च न्यायालयाने ऱ्हदय शस्त्रक्रिया झालेल्या पद्मावारला दिला अटकपुर्व जामीन 11 कोटीच्या डांबर घोटाळ्याचे प्रकरण भरपूर गाजल्यानंतर आता 4 जणांना जामीन मिळाला आहे. एकाला सार्वजनिक बांधकाम विभागाने गुन्ह्यातून मुक्त केले आणि आता एकच पकडायचा शिल्लक राहिला आहे.डांबर घोटाळ्यातील पकडलेल्या तिसऱ्या कंत्राटदाराला दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधिश के.एन. गौतम यांनी नियममित जामीन मंजूर केला आहे. 3 सप्टेंबर 2018

पैनगंगा नदीपात्रात वाळूतस्करांचा धुडघूस…. दोघांकडून दंड वसूल

पकडलेली वाहने सोडून देण्याचा प्रताप केल्याचा आरोप… कामारी मध्ये एसडीओ येताच रेती तस्कर झाले होते फरार… विदर्भ – मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याची संधी साधून वाळूतस्करांनी उच्छाद मांडला असून, रात्री-अपरात्रीला सर्रास रेतीचा तस्करी करून साठेबाजी करणे आणि अववच्या सव्वा दराने गरजूना विक्री करण्याचा गोरखधंदा चालविला आहे. असे असताना देखील रात्र गस्तीचे नेमलेल्या

किनवट न.प.घनकचरा व्यवस्थापन साईटच्या कामाच्या चौकशीची मागणी

किनवट नगर परिषद हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन साईट विकसित करण्यासाठी सन्‌ 2007 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी संगनमत करून नगर परिषदेच्या विकास कामांसाठी आरक्षित असलेली 46 क्रमांकाची 4 हेक्टर 88 आर ही मालमत्ता ठरवलेल्या रकमेपेक्षा अधिकचा मोबदला देऊन खरेदी केली हाेती. ही मालमत्ता अद्यापपर्यंत नगर परिषदेच्या नावावर झालेली नसतांनाही, आता या जागेवर 1 कोटी 44 लाख

लोकसभा निवडणुकीत खर्चाची रक्कम 70 लाख

अनामत रक्कम सर्वसाधारण 25 हजार राखीव प्रवर्गासाठी 12 हजार 500 लोकसभा निवडणुक जाहीर झाल्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघ क्रं.16 च्या संदर्भाने माहिती देतांना यंदाच्या निवडणुकीत उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये करण्यात आली असून सर्वसाधारण उमेदवारांकरीता 25 हजार रुपये अनामत रक्कम तर राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांकरीता 12 हजार 500 रुपये अशी अनामत रक्कम असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा

कंधार तहसिलवर मातंग समाजाचा मोर्चा धडकला

आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या तोकतोडे कुटूंबाला आर्थिक मदत द्या गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे म्हणून प्रश्न प्रलंबित आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाचे अनुसूचित जातीत वर्गीकरण करुन आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनेने धरणे आंदोलने केली होती.परंतु शासनाच्या वतीने कसलीच दखल घेतली नसल्यामुळे मातंग समाजातील तरुण संजय भाऊ ताकतोडे यांनी

महाराष्ट्रात पहिल्या चार टप्प्यात मतदान

देशभरात सात टप्प्यात होणार मतदान देशात १७ व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिनांक ११ एप्रिल ते १९ मे २०१९ या कालावधीत एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार असून २३ मे २०१९ रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात ११, १८, २३ आणि २९ एप्रिल २०१९ या तारखांना

देशात ७ टप्प्यात होणार लोकसभा निवडणुका, मतमोजणी २३ मेला

देशात ७ टप्प्यात निवडणुका होणार असल्याची घोषणा केली आहे. याची मतमोजणी २३ मे ला होणार आहे अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली असून, विद्यमान लोकसभेचा कार्यकाळ ३ जूनला संपणार आहे. निवडणूक आयोगाने लोकसभेच्या एकूण ५४३ जागांवर ७ टप्प्यात निवडणुकीची घोषणा केली आहे. ११, १८, २३,

स्वारातीम विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेचा गौरव

दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.नांदेड यांच्यावतीने भारत सरकारचे माजी केंद्रीय कृषीमंत्री पद्मविभूषण खा.शरदचंद्रजी पवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकरावजी चव्हाण यांच्या शुभहस्ते नांदेड जिल्ह्यातील उत्कृष्ट पतसंस्था म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. विष्णुपुरी, नांदेडचा नुकताच गौरव करण्यात आला. एखादी पतसंस्था अश्वासक प्रगतीकडे, विश्वासाकडे, मानवाच्या कल्याणाकडे वाटचाल करीत असते,

स्थानिक गुन्हा शाखेचा आयपीसी सोडून महसुल कायद्यावर भर

भगवान श्री गणेशला 3 हजार मोदकांचा नैवेद्य आयपीसी आणि सीआरपीसी सोडून स्थानिक गुन्हा शाखेने आता महसुल कायद्याचा अवैध असणाऱ्या रेतीवर कार्यवाही करण्याची श्रृंखला सुरू करण्याचा विचार केला आहे. त्यातील पहिला प्रकार काल पिंपळगाव (येवला) व शेलवाडी गावात प्रत्यक्षात आणला. सोबतच इतर दोन गांवामध्ये मात्र आपल्या घरी गेलेल्या गणपतीला 3 हजार मोदकांचा नैवेद्य लावून आपल्या कामगिरीत