संगाम लोहा कॉलेजमध्‍ये विद्यार्थी जीवन व अध्‍यात्‍म यावर व्‍याख्‍यान

लोहा येथील श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा, विद्यार्थी वाणिज्‍य मंडळ व वाणिज्‍य विभागाच्‍या वतीने महात्‍मा गांधी पुण्‍यतीथी निमित्‍त विद्यार्थी जीवन व अध्‍यात्‍म यावर श्री जी.बी. कदम यांचे व्‍याख्‍यान आयोजीत करण्‍यात आले होते. स्‍वतःला ओळखणे आत्‍माला ओळखणे. मी म्‍हणजे कोण हे सर्व जाणणे आपले कर्तव्‍य काय आहे हे विद्यार्थ्‍यांनी ओळखणे म्‍हणजेच अध्‍यात्‍म असे प्रतिपादीत केले.

शिक्षण ही शांततामय क्रांती आहे – प्राचार्य डॉ. सुरेश सावंत

राष्ट्रमाता विद्यामंदिर शाळेचे स्नेहसंमेलन संपन्न समाजात अत्तापर्यंत अनेक रक्तरंजीत क्रांती झाल्या आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी, वित्तहानी आणि पर्यावरणाची हानी झालेली आहे. परंतु शिक्षण ही अशी शांततामय क्रांती आहे, ज्यातून सदृढ समाजाची निर्मिती होते, असे मत प्राचार्य डॉ. सुरेश सावंत यांनी व्यक्त केले. राष्ट्रमाता विद्यामंदिर प्रशालेच्या वतीने शिवपार्वती मंगल कार्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले

माहिती अधिकार कार्यकर्ते दत्ताञय अनंतवार यांच्यावर राॅकेल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न

न्यायालयाच्या आदेशाने चौघाविरोधात मनाठा ठाण्यात गुन्हा दाखल नांदेड येथील माहिती अधिकार तपास समितीचे संस्थापक अध्यक्ष दत्ताञय अनंतवार यांच्या अंगावर राॅकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बरडशेवाळा येथिल चौघांवर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, हदगांव यांच्या आदेशाने मनाठा पोलीस ठाण्याच्या डायरीत गुन्हा दाखल करण्यांत आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, माहिती अधिकार तपास समिती, महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष

हेराफेरी करणाऱ्या संगणक चालकास आणखी दोन दिवसाची पोलीस कस्टडी

पोलीस निरीक्षक रवींद्र बोरसे यांची माहिती हिमायतनगर येथील डाक कार्यालयातील असताना ३२ लक्ष ३० हजार ९५३ रुपयाच्या अपहार करणारा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मुख्य आरोपी संगणक चालक बाबारावाला शनिवारी न्यायालयात हजार केले असत यातील घटनेतील तपासासाठी आणखी दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. त्यामुळे अपहार प्रकरणातील तपासाला यामुळे आणखी मदत मिळणार आहे अशी माहिती पोलीस

बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन केला वाटमारीच्या घटनेचा निषेध

हिमायतनगरच्या व्यापाऱ्यांनी दाखविली एकजुटता नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील ग्रामीण भागातील दोन व्यापाऱ्यांना अडवून लोखंडी रोडने मारहाण करून ९० हजारांची रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारच्या रात्रीला घडली होती. शुक्रवारी सकाळी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, या वाटमारीच्या घटनेच्या निषेधार्थ हिमायतनगर शहरातील व्यापारी असोशियनचे अध्यक्ष शांतीलाल श्रीश्रीमाळ यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.

पत्रकार किशोरकुमार – नईम खान शक्ती फिल्म प्रोडक्शनच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित

नांदेड येथील मुक्त पत्रकार किशोरकुमार वागदरीकर तसेच नांदेड टूडे चे संपादक नईम खान यांना नुकताच राजस्थान येथील शक्ती फिल्म प्रोडक्शन तथा पिपल ग्रोथ ऑर्गनायझेशन कडून महाराष्ट्र उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. राजस्थान मधील जयपूर शहरातील हॉटेल सफारी येथे हा समारोह संपन्न झाला. यावेळी अंबालिका राज, रिंकू सिंह गुर्जर यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री

शहिद भाई मनीसिंघजी सिकलीकर सेवाभावी संस्थेच्या प्रदेश कार्यालयाचे उद्‌घाटन

नांदेड शहरातील संत गाडगेबाबा सोसायटी कौठा येथे शहिद भाई मनीसिंघजी सिकलीकर सेवाभावी संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्‌घाटन संत बाबा बलविंदरसिंघजी व संत बाबा प्रेमसिंघजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अल्पसंख्याक कमिटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरजितसिंघ खुंगड, चंद्रपुर येथील गुरुप्रितसिंघ सचदेव, सरवनसिंघ डांगी, पत्रकार रविंद्रसिंघ मोदी, बलजितसिंघ बावरी, ज्ञानी तेगासिंघ आदीसह अनेकांची उपस्थिती होती. सिकलीकर

“सचखंड” आणि “श्री गंगानगर ” प्लैटफॉर्म एक वर घेण्याची मागणी

अतिरिक्त डी. आर. एम. यांना निवेदन नांदेडच्या गुरुद्वारा दर्शनासाठी मुद्दामहुन सुरु करण्यात आलेल्या सचखंड एक्सप्रेस आणि श्री गंगानगर एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना नांदेड़ मध्ये प्लैटफॉर्म क्रमाँक एक वर जागा मिळावी या मागणीसाठी शुक्रवार ता. 1 फेब्रुवारी रोजी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड़ विभागाचे अतिरिक्त व्यवस्थापक विश्वनाथ एरा यांना निवेदन सादर करण्यात आले. मागील तीन चार महिन्या पासून

विष्णुपुरी येथे जल वाहीनि फुटुन लाखो लिटर पाण्याची नासाडी

काळेश्वर देवस्थान विष्णुपुरी येथील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या विहिरीतून तुप्पा,धणेगाव, बळीरामपुर, वाजेगाव या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असलेली टाइप लाइन विष्णुपुरी काळेश्वर कमाणी जवळ वाल मधुनच लिकेज् होवून फुटल्या मुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे सदर घटना दी 1 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता घडली याबाबत अधिक माहिती आसी कि विष्णुपुरी काळेश्वर

हरीसिंग राठोड मृत्यू प्रकरणांत सभापती चव्हाण सह 4 कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

हदगाव कृषी उत्त्पन्न बाजार समिती हदगावच्या जागेवर अतिक्रमण व मारहाण केल्या प्रकरणावरून दत्त बर्डी तांडा येथील हरिसिंग व इतर 3 जणांवर 353 कलमनुसार गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणावरून हरिसिंग राठोड यास अटक केली होती. त्यांचा हदगाव येथील पोलीसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला त्यावरून कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती शामराव चव्हाण, बाजार समितीचे सचिव अविनाश