किरंमगाव वासियांचा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार

स्वातंत्र्याच्या काळापासून रस्त्याच्या प्रतीक्षेत नागरिक… समस्या मार्गी लागल्याशिवाय माघार घेणार नाही…. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या मौजे किरंमगाव येथील गावकर्यांनी रस्त्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा दि.१८ रोजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत रस्त्याची समस्या मार्गी लागल्याशिवाय बहिष्काराचा निर्णय मागे घेणार नसल्याचे गावकर्यांनी सांगितले आहे. गेल्या ७० वर्षांपासून

नांदेडच्या योगेश मुंडकरने सलग तिसऱ्या वर्षी जिंकला परमेश्वर यात्रेतील कुस्तीचा फड

भारतात प्रसीध्द असलेली हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिराच्या यात्रेतील सर्वात महत्वाचा व शेवटचा कुस्तीची दंगलीच फॅड चांगलाच गाजला असून, सोमवारी झालेल्या दंगलीत अव्वल नंबरच्या मानाची कुस्ती नांदेडच्या योगेश मुंडकरने जिंकुन बजरंगदल शाखा हिमायतनगरच्या वतीने ठेवण्यात आलेल्या ७ हजारच्या बक्षिसाच मानकरी सलग तिसऱ्यां वर्षी देखील मुंडकरांचा ठरला असल्याने युवकांनी त्याची जल्लोषात मिरवणूक काढली होती. नांदेड जिल्ह्यातील

श्री परमेश्वर यात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीपर गीतांनी गाजला

घारापुर शाळेने जिंकला सलग दुसऱ्या वर्षीही अव्वल क्रमांक नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील श्री परमेश्वरच्या महाशीवरात्री यात्रेला रंगत चढली असून, शालेय स्पर्धेने उत्सव गाजत असून, नुकत्याच शाहिद झालेल्या पुलवामा हल्ल्याचा निषेध स्पर्धेत सामील झालेल्या प्रत्येक शालेय विद्यार्थाच्या कलागुणांमधून स्पष्टपणे जाणवला असून, विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांच्या सादरीकरणास वीर जवान अमर रहे…. अमर रहे अमर रहेचे नारे देऊन

महीला दिनानिमित्त शहीद जवानांच्या विर – वधुना महिलांनी केला सलाम

हदगाव शहरात शहिदांना वाहिली आदरांजली हदगाव शहरात जागतिक महीला दिना निमित्तानं पुलवामा येथे दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या विर जवानांना आदरांजली वाहत व शहीदाच्या विर – वधुना हदगाव शहराच्या महीला द्वरे सलाम करत ७१ वर्ष स्वतंत्र अधिक ४४ जवान असे मिळून ११५ मीटर तिरंगा ध्वज घेवुन रँली काढली होती. या रैलीमध्ये महीलानी बहुसंख्याने सहभागा नोदविला होता.

हिमायतनगर बीजेपी तालुकाध्यक्षपदी आशिष सकवांन

येथील भाजप तालुकाध्यक्ष पदासाठी बंजारा समाजाचे धडाडीचे नेतृत्व तथा बूथ कमिट्या स्थापन करण्यात अव्वल स्थान मिळविणारे आशिषभाऊ बाबुराव सकवांन यांची जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकरांनी हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी वर्णी लावल्याबद्दल तालुक्यात फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला आहे. मागील लोकसभा निवडणुकीनंतर हिमायतनगर तालुक्यात भाजपच्या संघटन वाढीला सुरुवात झाली असून, माजी खा.सुभाष वानखेडे यांच्या अनेतृत्वखाली विधानसभा मतदार संघात

शोभायात्रा व काल्याच्या कीर्तनाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता….।

जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर दिंडीत सामील  मागील आठ दिवसापासुन सुरु असलेल्या अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता दि. ०९ मार्च शनिवारी ग्रामदिंडी व हभप. रविदास महाराज चव्हाण यांच्या मधुर वाणीतील काल्याच्या किर्तनाने करण्यात आली. याप्रसंगी ग्रामीण व शहरी भागातुन हजारोंच्यावर श्री परमेश्वर भक्तांचा जनसागर लोटला होता. ग्रंथराज पारायण शेवटच्या दिवशी रात्रीला

परमेश्वर मंदिराचे रूप पालटण्यासाठी भविष्यकाळात निश्चितपणे प्रयत्न करणार – मा. आ. माधवराव पाटील जवळगावकर

” शिवपर्व २०१९” विशेषांकाचे जवळगावकरांच्या हस्ते शानदार प्रकाशन हिमायतनगर तालुका माझा मी हिमायतनगर तालुक्याचा आहे, तालुक्याच्या वैकासाच्या बाबतीत आणि विशेषतःतीर्थक्षेत्र श्री परमेश्वर मंदिराच्या विकासासाठी आपल्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने मी प्रयत्न केले. त्यामुळे ५ ते ७ वर्षांपूर्वीचा मंदिर परिसर आणि आजचा मंदिर परिसर यामध्ये जमीन आसमांनचा विकासात्मक फरक दिसून येत आहे. नवसाला पावणारा श्री परमेश्वर व

गोंधळी गीत व बोटाच्या हावभावांवरून हिमायतनगर वासीय मंत्रमुग्ध

शिवाजी महाराजांच्या काळापासून आत्मसात असलेल्या कलां आणि गोंधळी गीतांचे प्रदर्शन करीत तुळजापूरच्या गोंधळी मंडळींनी हिमायतनगर (वाढोणा) वाशीयांना मंत्रमुग्ध करून मने जिंकली असून, गावागावात जाऊन कला लोकांना अवगत करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मूळचे तुळजापूर येथील रहिवाशी सध्याचे पिंपळगाव (चिलमखां) ता देऊळगावराजा जि बुलढाणा येथील कलावंताच्या टीमने यंदाच्या गोंधळी कार्याला महाशिवरारीच्या पर्वावर सुरुवात केली असून, छत्रपती

महाशीवरात्रीच्या पावन पर्वावर लाखो भावीकांनी घेतले श्री परमेश्वराचे दर्शन

हर हर महादेव… परमेश्वर भगवान कि जयच्या नामघोषात वाढोणा – वारणावतीचे जागृत देवस्थान श्री परमेश्वर दर्शनासाठी माघ कृ.१३ दि.०४ सोमवारी आलेल्या महाशिवरात्रीच्या शुभमुहुर्तावर जिल्हयासह मराठवाडा – विदर्भ – तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील लाखो भावीकांनी श्रीचे दर्शन घेतले. त्यामुळे मंदिर परिसरात भक्तांची मंदियाळी दिसुन आली. भक्तांच्या गर्दीमुळे शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अनेक भक्तानी महाशिवरात्रीच्या