तलवारीने हल्ला करून उजवा हात लटकवणाऱ्याला पोलीस कोठडी

शहरातील बाफना रस्त्यावर गुरुद्वारातील एका सेवादारावर जीव घेणा हल्ला करणाऱ्या 20 वर्षीय युवकाला मुख्य न्यायदंडाधिकारी रविंद्र करंकाळ यांनी 18 फेबु्रवारी 2019 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

तेलपालसिंघ ग्यानी अवतारसिंघ (30) हा युवक गुरुद्वारा येथे सेवादार म्हणून कार्यरत आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार 14 फेबु्रवारी रोजी रात्री 8.30 च्या सुमारास बाफना रस्त्यावरील सन्नी धाबासमोर उभ्या असलेल्या लवप्रितसिंघ कलवंतसिंघ ढोल (19)रा.तरणतारण जिल्हा पंजाब याने माझ्याकडे काय पाहतोस असे सांगत आपल्या हातातील तलवचारीने तेजपालसिंघवर जोरदार हल्ला केला. त्यात त्याच्या उजव्या हाताच्या कोपरापासून हातवेगळा होता होता वाचला. जोरदार रक्तस्त्राव झाला आणि जखमी तेजपालसिंघवर उपचार सुरू आहेत. वजिराबाद पोलीसांनी लवप्रितसिंघ विरुध्द जीवघेणा हल्ला या सदराखाली गुन्हा दाखल केला.

आज दि.16 फेबु्रवारी रोजी सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल बडे, पोलीस कर्मचारी जसपालसिंघ पुसरी, दिलीप राठोड संभाजी व्यवहारे यांनी लवप्रितसिंघला न्यायालयात हजर करून तपासासाठी पोलीस कोठडी मागितली. ती मागणी न्या.करंकाळ यांनी 18 फेबु्रवारी पर्यंत मंजूर केली आहे.

You may also like