पोलीस उपनिरिक्षक शितल चव्हाणची ‘सुपारी’ घेवून बदनामी

वाहतूक शाखेच्या पोलीस निरिक्षकांची चौकशी होण्याची चिन्हे ?

आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळत पोलीस उपनिरिक्षक शितल चव्हाण यांनी 4711 मोटार वाहन कायद्याप्रमाणे खटले भरून 13 लाख 92 हजार 500 रुपये दंड वसुल केला. आपण स्वत:हून त्यांनी पोलीस अधिक्षकांना विनंती केल्यानंतर त्यांची 13 फेबु्रवारी रोजी पोलीस अधिक्षक संजय जाधव यांनी वाहतूक शाखेतून बदलून चिडीमार पथकात तैनाती केली. पण कोणी तरी ‘गुत्ते’ घेऊन त्यांची बदनामी करण्याचा सुरू केलेला कट आता गुत्ते घेणाऱ्याच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण शितल चव्हाण यांनी पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनानुसार वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांची चौकशी सुरू झाल्याची ‘गुप्त’ महिती प्राप्त झाली आहे.

गेल्या दोन-चार दिवसांपासून एका गिट्टीच्या गाडीची हवा सोडल्याच्या कारणावरुन पोलीस उपनिरिक्षक शितल चव्हाण यांच्याविरुध्द रान उठवले जात आहे. त्या गाडी संदर्भाची सविस्तर माहिती अशी आहे की, 9 फेबु्रवारी 2019 रोजी शितल चव्हाण यांनी महात्मा फुले शाळेजवळून शासकीय विश्रामगृहाकडे जाणाऱ्या अत्यंत छोट्याश्या रस्त्यावर पकडली. मुळात या रस्त्यावरून जड वाहने नेण्यास बंदी आहे तसे बॅरीकेट सुध्दा त्या रस्त्यावर लावलेले आहेत. पण ते बॅरीकेट काढून ठेवलेले आहेत. फक्त दोन खांब उभे आहेत आणि त्या रस्त्यावर ही गाडी शितल चव्हाण यांनी पकडली आणि त्या गिट्टी भरलेल्या गाडीचा क्रमांक एम.एच.10 झेड 1496 असा आहे. या गाडी संदर्भाने 9 फेबु्रवारी रोजीच शितल चव्हाण यांनी एक पत्र जावक केले. त्या पत्रावर जावक क्रमांक टाकून देण्यात आलेला नाही. त्या पत्रात गाडी क्रमांक 1496 चा फिटनेस दि.24 जानेवारी 2019 रोजी समाप्त झाला असून त्या वाहनावर कार्यवाही व्हावी अशी विनंती करण्यात आली आहे.

हे पत्र घेऊन जाणाऱ्या वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याला आरटीओ कार्यालयात असा अनुभव आला की, तेथील लिपिक मंडळी त्याला सांगत होती की, तुमच्या पोलीस निरिक्षकांची दा.पा.र.अशी स्वाक्षरी असेल तरच आम्ही हे पत्र घेणार तेंव्हा तो पोलीस कर्मचारी म्हणाला मी आणलेले पत्र सुध्दा एका पोलीस अधिकाऱ्याने लिहिलेले आहे आणि तुम्हाला घ्यायचे नसेल तर तसे लिहुन द्या. मग पोलीस उपनिरिक्षक शितल चव्हाण यांचे पत्र आरटीओ कार्यालयाने घेतले. आज 16 फेबु्रवारी उजाडली तरीपण आरटीओ कार्यालयाचे पथक 1496 गाडी तपासण्यासाठी आले नाही आणि त्यावर कार्यवाही सुध्दा केली नाही.

शितल चव्हाण विरुध्द आलेल्या प्रसारमाध्यमातील बातम्यांना आधार करून ‘ मी नाही त्यातली….’ असा आवा आणून त्याचे प्रसारण व्हॉटसऍप माध्यमातून सुरू आहे. या संदर्भाने मागोवा घेतला असतांना 4 फेबु्रवारी 2019 रोजी एक ट्रॅक्टर पकडल्या गेला आहे. त्या ट्रक्टरमध्ये रेती भरलेली आहे आणि तो कोण्यातरी शब्द गुंडाचा आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे आणि त्यामुळेच शितल चव्हाण आणि त्यांचे पती विनायक शेळके या दोन्ही पोलीस उपनिरिक्षकाविरुध्द कोल्हे कुई सुरू आहे. कोल्हे कुईमध्ये खरेच लांडगा आला तर काय उपद्याप होतात ह्याची शिकवण सर्वांना बालपणीच मिळालेली आहे. तरीपण ही कोल्हे कुई सुरू आहे. प्रसार माध्यमांनी त्या 1496 गाडीची हवा सोडल्याने त्या गाडीचा मालक शेख एजाज बाबू याने माझे नुकसान झाल्याची तक्रार दिल्याचा पुरावा मांडला जात आहे. पण प्रत्यक्षात फिटनेस समाप्त झाले आहे याचा उल्लेख कोठेच केलेला नाही. जर त्या गाडीचा फिटनेस समाप्त झाला असेल तर ती टायरमधील हवा सुध्दा संपू शकते.

या सर्व प्रकारणात शितल चव्हाण यांची बदली गिट्टीच्या गाडीची हवा सोडली म्हणून झाल्याचे नमुद आहे. शितल चव्हाण यांनी 9 फेबु्रवारी रोजी गिट्टीची गाडी क्रमांक 1496 पकडली. दोन महिला पोलीस त्या गाडीत बसल्या आणि ती गाडी पोलीस मुख्यालयात उभी करण्यात आली. शितल चव्हाण यांना त्या गाडीची हवा सोडण्याशिवाय दुसरे कांही कामच नव्हते काय असा प्रश्न समोर येतो. शितल चव्हाण यांनी तर 29 डिसेंबर 2018 रोजी आपल्या विनंतीनुसार पोलीस अधिक्षकांना मला वाहतूक शाखेतील पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम हे त्रास देत आहेत. म्हणून माझी बदली पोलीस अधिक्षक कार्यालयातील कोणत्याही शाखेत करावी असा अर्ज दिला होता. त्या अर्जानुसारच पोलीस अधिक्षक संजय जाधव यांनी शितल चव्हाण यांची बदली केलेली आहे. …….. रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड.

You may also like