खा.अशोक चव्हाणांच्या जाहीर व्यक्तव्यानंतर सुध्दा मटका बंद झालाच नाही

जुगार आणि लॉटरी जोमात सुरूच

देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत असतांनाच राज्यात सुध्दा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या दोन निवडणुकांच्या व्यस्ततेत आता कोणालाच कांही पाहायला वेळ नाही. खा.अशोक चव्हाण यांनी सुध्दा एका जाहीर सभेत आपल्या पक्षाच्या युवा संघटनेला आठ दिवसांचा वेळ देवून सांगितले होते की, पोलीसांनी आठ दिवसात मटका बंद केला नाही तर तुम्हाला करायचा आहे. अशोकरावजींच्या एकाही युवकाने मटका बंद करण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. आता तर निवडणुक सुरू झाली आहे. आता अशोक चव्हाण यांना सुध्दा वेळ मिळणार नाही. खासदार साहेब जिल्ह्यात, शहरात मटका, जुगार आणि वेगवेगळ्या प्रकारची ऑनलाईन लॉटरी सुरूच आहे असो असे चालणारच असते.

निवडणुकीचे पडघम वाजले आणि मटका जुगाराच्या चर्चा बंद झाल्या. सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना यासाठी मोकळे असेल तरच त्यांना कांही निधी मिळेल आणि तो निधी निवडणुकीमध्ये वापरता येणार आहे. विशेष पोलीस महानिरिक्षक आणि पोलीस अधिक्षक यांनी कांही दिवसांपुर्वी अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्याबदल्यामध्ये कोण कोणत्या राजकीय लोकांचे वजन होते याची माहिती आता लपून राहिलेली नाही. एखाद्या गरजवंत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याची बदली होत नाही. पण राजकीय वजन वापरले की, ती बरोबर होते. आजही अनेक पोलीस अधिकारी खितपत पडलेले आहेत. त्यांची कोणीच दखल घेतलेली नाही. नवीन ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांनी मागील पोलीस निरिक्षकांपेक्षा तीन पटीने दर वाढवून मागितला आहे. त्यातील कांही जणांनी आपल्या मर्जीचे कनिष्ठ अधिकारी आपल्या ठाण्यात बदली करून घेण्यामध्ये यश मिळवले आहे. ते काल रात्री जारी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्यांमधून स्पष्ट झाले.

नांदेड शहराच्या नदीपलीकडे दक्षीण दिशेत नदीनंतर उजवीकडे वळल्यानंतर लागणारे डाव्या हाताचे पहिले गाव आज तर जुगारासाठी महत्वपूर्ण झाले आहे. या पोलीस ठाण्यात नव्याने आलेले पोलीस निरिक्षक आपले ठाणे आमदाराच्या मर्जीने चालवतात अशी त्यांची ख्याती आहे. त्या संदर्भाचा एक ऑडीओ मागे वायरल झाला होता. एखाद्या कामधंदा नसलेल्या व्यक्तीने जुगाराचा आड्डा, मटका, लॉटरी चालवून आपल्या कुटूंबाचा चरितार्थ चालवला तर या व्यवसायांना सुध्दा चुकीचे म्हटले जाणार नाही. पण या व्यवसायांमध्ये आता मोठी स्पर्धा झाली आहे. एका माणसाने एखाद्या भागात जुगाराचा अड्डा, मटक्याची दुकान, लॉटरी सेंटर चालवले तर आपण सुध्दा तेच करावे अशी स्पर्धा तयार झाली आहे. शहरात आणि जिल्ह्यात अनेक पोलीस कर्मचारी यात भागीदार झाले आहेत. लोकांना सांगण्यासाठी आपला त्याचा कांही संबंध न ाही असे म्हणत असले तरी त्या अनेक पोलीसांचा नोकरीचा अभिलेख वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष पथकात असल्याच्या नोंदी आहेत. अशा प्रकारचे पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष पथकात आहेत म्हणजे नक्की काय याचे आकलन करण्याइतपत बौध्दीक क्षमता आमच्यात नाही.

अनेक ठिकाणी शब्दगुंड सुध्दा अनेकांना विक्री करतात त्यामध्ये मी त्यांना सांगतो, मी पाहून घेतो, मी बोलतो, मी बसतो अशा विविध शब्दांचा प्रयोग करून जुगार, मटका, लॉटरी, चालवणाऱ्याकडे त्या माणसाची विक्री करतात आणि आपल्या भाकरीवर तुप ओढण्याचा प्रकार त्या शब्दगुंडांकडून अव्याहत सुरू असतो. पैशांची गरज अंबानी कुटूंबीयांसह जगातील प्रत्येक माणसाला आवश्यक आहे. 125 कोटीच्या भारतात आयकर विभागात जमा होणारी कर रक्कम एकटे अंबानी कुटूंबिय 4 टक्के भरतात. त्यांना सुध्दा पैशांची गरज आहे आणि सर्वसामान्य माणसाला सुध्दा पैशाची गरज आहे. यात फरक एवढाच आहे की, अंबानींना करोडोने पैशांची गरज आहे. तर सर्वसामान्य माणसाला संध्याकाळच्या जेवणाची चिंता आहे. चुकीच्या मार्गाने पैसे कमवणाऱ्यांच्या घरचा इतिहास तपासला तर त्यांच्याकडे येणाऱ्या रक्कमेपेक्षा कितीतरी मोठी रक्कम फक्त दवाखान्यामध्ये जाते. मग जास्तीचे पैसे कमावून काय मिळाले. असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एवढे मात्र नक्कीच नांदेड जिल्ह्याची शान असलेल्या खा.अशोक चव्हाण यांनी सांगितल्यानंतर सुध्दा आजही नांदेड जिल्ह्यात, शहरात कोठेही मटका, जुगार, लॉटरी बंद झालेली नाही. मी काही तरी छान केले अशा अर्विभावात वागणारी मंडळी स्वत:किती त्रासात आहे हे त्यांचे त्यांनाच माहित आता सध्या निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाल्याने सध्या तरी हा मटका, जुगार आणि लॉटरी बंद होणार नाही असे सध्या तरी जाणवते आहे.

……रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड.

You may also like