नंदगावामध्ये विषारी दारू पिऊन एका इसमाचा मृत्यू

इस्लापूरपासून अंदाजे 15 कि.मी. अंतरावर नंदगाव आहे. ह्या गावात गेल्या अनेक दिवसांपासून गावठी दारू पाडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे तेथील पत्रकार गंगाराम गड्डमवाड यांनी नंदगावच्या बीट जमादारांना वारंवार सांगूनही दारू बंद न केल्याने अखेर दि. 8 मार्च रोजी विषारी दारू पिऊन ईश्वर विश्वांबर पाटील (50) रा. नंदगाव येथील रहिवासी असलेले त्यांचा मृत्यू झाला.

गेल्या अनेक महिन्यांपासून हातभट्या नंदगावामध्ये वाढल्याचे सांगुनही बीट जमादाराने या बाबींकडे लक्ष न दिल्याने एक गरीब घरच्या ईश्वराला आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक तरूण देखील याच मार्गावर आहेत, यांची वेळीच दखल न घेतल्याने अनेकांचे संसार उद्धवस्त होतील यासाठी गावातील सुजान नागरिकांनी दारू विषयी तंटामुक्तीमध्ये मिटींग घेतली मात्र बीट जमादारांना सांगुनही बिट जमादारांने याकडे लक्ष दिलेच नाही कारण यांना दारूवाल्यांकडून हप्ते मिळतात आणि ते स्वत: हप्तेही वसुली करण्यात अशी चर्चा गावातील चावडीवर गावकऱ्यांत एैकावयास मिळत आहे. मे. साहेबांनी या परिसरातील खेड्यापाड्यातील दारू बंद करावे, नसता निष्पाप गरीब लोकांचे बळी गेल्या शिवाय राहणार नाही. हातभट्टी पिणारे आदिवासी, गोरगरीब जनतेचा बळी जातो. कुणाचे काय जाते ? कुणाचा भाऊ जातो तर कुणाचा धनी जातो, कुणाचा बाप जातो याचा जवाब बीट जमादारांना कोण विचारणार कारण यांना हप्ते मिळतात हप्त्यापाई गोरगरीबांच्या जीवनांची खेळू नका हे बिट जमादार साहेब असा टाहो महिला फोडीत होत्या.

You may also like