मुखेेेड तालुक्यातील बावलगांवच्या सरपंचास 1600 रुपयाची लाच घेताना अटक

शौचालयाचे बिल काढण्यासाठी घेत होते पैसे

मुखेड तालुक्यातील बावलगांव येथील सरपंच श्रीमती लक्ष्मीबाई जयवंत माने व अन्य एका साथीदारास आज शौचालयाचे बिल काढण्यासाठी 1600 रुपये लाच घेताना ग्रामीण बँक बेटमोगरा येथील परिसरात दि 11 रोजी अटक करण्यात आली.त्यांच्यावर मुखेड पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

स्वच्छ भारत योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी एका व्यक्तीस 12 हजार रुपयाचे अनुदान मिळत असते. हे अनुदान मिळण्यासाठी सरपंच लक्ष्मीबाई माने यांनी तक्रारदाराच्या दोन मुलांचे चेक काढण्यासाठी 1600 रुपयाची मागणी केली.यामुळे तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय नांदेडसी संपर्क साधून तक्रार दिली होती.या तक्रारीच्या आधारे आज प्रशासनाने पडताळणी केली असता लोकसेवक लक्ष्मीबाई जयंवत माने यांच्या सांगण्यावरुन खाजगी इसम देविदास कोंडीबा साखरे रा.कोळगांव यांनी तक्रारदार यांचे नमूद कामासाठी पंचासमक्ष 1600 रुपये लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर त्यांना लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडण्यात आले.

आरोपी लोकसेवक सरपंच श्रीमती लक्ष्मीबाई जयंवत माने (50) व खाजगी व्यक्ती देविदास कोंडीबा साखरे (52) रा.कोळगांव यांचे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध (संशोधन)अधिनियम 2018 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक संजय लाटकर,अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती अर्चना पाटील तसेच पोलीस उपअधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कपिल शेळके, पो.ना.जगन्नाथ अनंतवार, एकनाथ गंगातीर्थ, पो.कॉ.दिपक पवार, मपोना आशा गायकवाड,पो.ना.अनिल कदम यांनी पार पाडली. या कार्यवाहीमुळे खाबुगिरी करणा­-या सरपंचाचे धाबे दणाणले आहेत.

………ज्ञानेश्वर डोईजड, मुखेड.

You may also like