तीन वर्षांपासून फरार चंदन चोरास ग्रामीण स्थागुशाकडून अटक

गेल्या तीन वर्षांपासून कलम ३७९ चंदन चोर मधील आरोपी भगवान जाधव, रा रानसुगाव या आरोपीस ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी शेतातील आखाड्यावरून अटक केली.

या प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विष्णुपुरी परिसरातील ग्रामीण पॉलीटेकनिक कॉलेज परिसरातील २७ नोव्हेंबर २०१५ रोजी मध्यरात्री चंदनाचे अंदाजे २५ हजार रुपयांची झाडे चोरुन नेल्या प्रकरणी गु र १५/१६ कलाम नं ३७९ नुसार तीन चंदन चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील दोन आरोपीना अटक करण्यात आली होती तर एक आरोपी गेल्या तीन वर्षांपासून फरार होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून ग्रामीणचे पो नि पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस ठाण्यातील स्थानिक गुन्हेशाखेचे पो उप नि शेख जावेद, पो हे कॉ व्यंकट मोकले , ना पो कॉ मालदोडे, केंद्रे, पो कॉ नागरगोजे, गुंडेकर यांनी तीन वर्षांपासून फरार आरोपी भगवान बालाजी जाधव, रा रानसुगाव ता नायगाव (खै ) यास शेतातील आखाड्यावरून मोठ्या शिताफीने अटक केली.

You may also like