अंगणवाडीतील निरागस बालकांना निकृष्ठ खाऊ पुरवणारा ट्रक

छावा संघटनेने पकडला

अंगणवाडीला भेसळयुक्त आणि निकृष्ठ प्रतिचा खाऊ पुरविणाऱ्या कंत्राटदारावर आणि त्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कायदेशीर कार्यवाही करण्याचा अर्ज छावा युवा संघटनेचे नितीन पाटील गिरडे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिला आहे.

नितीन गिरडे पाटील यांनी दिलेल्या अर्जानुसार ते त्यांचे मित्र संजुकुमार नायर, साईनाथ कदम, तानाजी पाटील व इतर कार्यकर्ते यांना माहिती प्राप्त झाली की, अंगणवाडी खाऊचा पुरवठा करणारे कंत्राटदार हे शासनाने ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा कमी दर्जाचे आणि बालकांच्या आरोग्यास धोका पोहचणारे आहे. तेंव्हा त्यांनी ट्रक क्रमांक एम.एच.26 एच.7572 या ट्रकला थांबवून तपासणी केली असता या ट्रकमधील धान्य कोहिनुर आईलमिलसमोर भरलेला आहे अशी माहिती ट्रक चालकाने दिली.

ट्रकमधील खाद्यपदार्थांची पाहणी केली असता ते सर्व पदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसले. या ट्रकममध्ये भरलेले सर्व साहित्य भेसळयुक्त आहेत. तरी अंगणवाडीतील निरागस बालकांना निकृष्ठ आणि भेसळयुक्त दर्जाचा खाऊ पुरवणारा कंत्राटदार आणि त्याच्यासोबत अशा भेसळयुक्त मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकावर योग्य कायदेशीर कार्यवाही करावी नसता आम्ही तिव्र आंदोलन करू आणि लहान मुलांच्या आरोग्याशी व जीवाशी खेळणाऱ्या पुरवठादारंचे कोणतेही वाहन रस्त्यावर चालू देणार नाही. या निवेदनावर नितीन गिरडे पाटील आणि संजीवकुमार नायर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या अर्जावर नांदेड ग्रामीण पोलीसांनी काय कार्यवाही केली याची माहिती मिळू शकली नाही.

You may also like