8 लाख 70 हजारांची फसवणूक.. वीज कंपनीला 7 लाखाचा चुना

एप्रिल ते 8 एप्रिल 2019 दरम्यान त्यांच्या भारतीय स्टेट बॅंक शाखा धर्माबाद येथील खात्यातून पश्चिम बंगालमधील नियामतपुर व गोपाळपुर येथे कोणीतरी अज्ञात आरोपींनी 1 लाख 60 हजार रुपये काढून घेतले आहेत. धर्माबाद पोलीसांनी भारतीय दंडविधानाच्या कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(3) नुसार गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरिक्षक भागवत जायभाये हे करीत आहेत.

मुखेड येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रसाद प्रदीप भारतीय यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फेबु्रवारी महिन्याच्या 60 दिवस अगोदरपासून मुखेड येथील अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि त्यातील माणसांनी ग्राहकांकडून वीज बिल पैसे घेतले ते वीज बिलाचे पैसे वीज कंपनीकडे न भरता ग्राहकांना पावत्यादेवून त्यांची दिशाभुल केली. सोबतच 21 फेबु्रवारी 2019 रोजी अण्णाभाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या कक्षाला आग लावून वीज बील भरणा केलेल्या पावत्या जळाल्याचे भासवले. सोबत वीज वितरण कंपनीचे 7 लाख 9 हजार 930 रुपये हडप केले. मुखेड पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंडविधानाच्या कलम 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक सावंत करीत आहेत.

You may also like