वाळूचे अवैध उत्खनन सुरूच महसुल विभाग मात्र झोपेत

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका महसूल विभागाच्या अधिका-यांच्या लाच खाऊ वृत्ती मुळे नायगाव तालुक्यातील गोदावरी पात्रातुन रात्र दिवस कधी गाढवा द्वारे तर कधी मजुर व जेसीपी च्या साहाय्याने वाळूचे अवैध उत्खनन सुरूच आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. नायगाव तालुक्यातील महसुलच्या अधिका-यांचे व मंडळधिकारी तलाट्यांचे मात्र या अवैध रेतीतुन चांगभले होत आहे .या सर्व बाबींना वरिष्ठ अधिका-यांचे पाठबळ असल्याने कितीही तक्रारी करून सुध्दा कोणत्याही महसुल अधिकारी किंवा कर्मचा-यांवर कार्यवाही होत नाही त्यामुळे जिल्ह्यात महसुल खाते आहे की नाही हा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.

नायगाव तालुक्यातील वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया रखडल्याने वाळूचे भाव गगणाला भिडले आहेत. वाळूच मिळत नसल्याने बांधकामे ठप्प झाली आहेत. नायगाव तालुक्यात बरबडा, बरबडा वाडी, मनूर, वजिरगाव, सातेगाव, बळेगाव, मेळगाव, धनंज, राहेर यासह अनेक ठिकाणी गोदावरी नदी पात्रात वाळूचे घाट आहेत. पण यंदा तालुक्यातील मेळगाव व धनंज या दोनच रेती घाटाचा लिलाव प्रक्रिया सुरु आहे. उर्वरीत वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया रखडली आहे. वास्तविक आक्टोबर महीण्यात वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया पूर्ण होवून नोव्हेंबर अखेर व डिसेंबर महीण्यात वाळू उपशाला सुरुवात होत होती. यंदा मात्र हरित लवादाच्या अटीमुळे ही प्रक्रिया रखडली आहे. त्यातच गतवर्षी लिलाव धारकांनीच मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा करुन नदी किणारी साठवणूक केली होती. याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या होत्या. तक्रारीनंतर साठवलेला अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आला त्या जप्त वाळूच्या लिलावाची प्रक्रिया चालूच आहे.

गेल्या वर्षी ज्या ज्या ठिकाणच्या वाळू घाटाचा लिलाव झाला त्या सर्वच वाळू घाटातून ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त उत्खनन झाले. त्या वाळूचा लिलाव होत असला तरी ज्यांनी ज्यांनी लिलावात जप्त वाळू घेतली त्या त्या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचे उत्खनन सुरु आहे. लिलावात घेतलेल्या वाळूच्या ढिगावरच पुन्हा अवैध उत्खनन केलेली वाळू आणून टाकल्या जात आहे. तर दुसरीकडे जप्त वाळू लिलावात घेतल्याचे सांगितल्या जात असून. एकाच पावतीवर दिवसातून दोन ते तीन फेऱ्या केल्या जात आहेत. सकाळी पाच ब्रासची एक हैवा कोल्हापूर किंवा सोलापूरला जाण्यासाठी निघते पण संध्याकाळी सात वाजले तरी ती हैवा नायगाव तालूक्यातच असते. लांब पल्याची वाहतूक दाखवून एकाच पावतीवर दिवसभर फेऱ्या मारल्या जात आहेत.

बरबडा, बरबडा वाडी, मनूर, वजिरगाव, सातेगाव, बळेगाव, मेळगाव, धनंज, राहेर, हुस्सा अदि ठिकाणी वाळू घाट आहेत. परंतू यातील मेळगाव व धनंज या दोनच वाळू घाटाच्या लिलावाची प्रक्रिया सुरु आहे. धनंज येथील एकाच वाळू घाटातून शासनाला कोट्यवधीचा महसूल मिळणार असल्याने वाळू घाटाला किती महत्त्व प्राप्त झाले आहे हे दिसून येते. तालुक्यातील वाळू घाटाच्या लिलावाची प्रक्रिया रखडल्याने याचा फायदा वाळू माफीयांना होत आहे. महसूलच्या यंत्रणेला धाब्यावर बसवून ज्या पद्धतीने अवैध वाळूचे उत्खनन करता येते ती पध्दत अवलंबवल्या जात आहे. एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नसला तरी सर्वच वाळू घाटातून चोरट्या मार्गाने अवैध उत्खनन चालूच आहे. विशेषतः राहेर, बळेगाव, हुस्सा, धनंज, सातेगाव अदि ठिकाणाहून सर्वात जास्त लपून छपून पण राजरोसपणे वाळूचे उत्खनन होत आहेत. हा प्रकार करणारे बडे माफीया असल्याने त्यांच्यावर का कारवाई होत नाही याचा मागोवा घेतला असता. महसूल विभागाचे तलाठी व मंडळ निरिक्षक अधिकाऱ्यांचे दौऱ्यांची माहीती पुरवत आहेत त्यानुसार अवैध वाळूची वाहतूकही होत असल्याचे बोलले जात आहे. मागील काळात नायगाव तहसीलदार यांच्या विरूध्द अनेक तक्रारी जिल्हाधिकारी यांच्या कडे करण्यात आले पण जिल्हाधिकारी यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने तहसीलदार ह्या वरचढ होत मी करेल तो कायदा म्हणत त्यांच्या मर्जी प्रमाणे वागत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून एकाच पावतीवर तीन फे-यां मारून टिप्पर धारक शासनाला चुन्ना लावत आहेत. नायगाव चे महसुल खाते काहीच करत नाही .एखाद्या इमानदार तलाठी किवा मंडळधिकारी अवैध मार्गाने जाणारे वाळूचे वाहन पकडले तर वरिष्ठ अधिकारी तो सोडून द्या असे सांगतात हे ही या तालुक्यातील वास्तव असल्याचे चिञ आहे.

You may also like