देगलूरमध्ये 1 लाख 75 हजाराची रक्कम पळवली

देगलूर येथे एका डॉक्टरची 1 लाख 75 हजार रुपयांची बॅग कोणी तरी चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार 13 मार्च 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता घडला.

खानापुर ता.देगलूर येथील डॉ. अशोक संतोष विश्वास (39) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 13 मार्च 2019 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास त्यांनी भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा जुना मोंढा मैदान देगलूर येथून 1 लाख 75 हजार रुपये एवढी रोख रक्कम एका पिशवीत ठेवून निघाले जुना मोंढा देगलुर येेथे आले असतांना त्यांनी आपली पैशाची बॅग मोटारसायकलच्या सिटवर ठेवून टायरची हवा तपासत असतांना कोणी तरी अज्ञात आरोपीतांनी ती रोख रक्कमेची पिशवी ज्यात बॅंकेचे पास बुक आणि चेकबुक सुध्दा होते चोरून नेली आहे. देगलूर पोलीसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक मनिषा पवार अधिक तपस करीत आहेत.

You may also like