नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन फरारी आरोपी पकडले

अपघात आणि चोरी करून फरार असलेल्या दोन आरोपींना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने आज जेरबंद केले आहे.

धनेश्वर नारायण ढगे रा.सैलानीनगर याच्याविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 117/2016 कलम भादवि 279, 427 प्रमाणे दाखल होता.पोलीसांनी त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषरोपपत्र सादर केले होते. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सुध्दा धनेश्वर ढगे न्यायालयाच्या प्रक्रियेत हजर राहत नव्हता त्यामुळे त्याच्याविरुध्द अटक वॉरंट जारी झाले. दुसऱ्या एका प्रकरणात योगेश सुभाष तेलंगे रा.सखोजीनगर नांदेड याच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 338/2017 कलम 379,34 भादविप्रमाणे दाखल होता. न्यायालयाने योगेश तेलंगेविरुध्द सुध्दा अटक वॉरंट जारी केले होते. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोधपथकाचे परिवेक्षाधिन पोलीस उपनिरिक्षक सोनवणे, पोलीस कर्मचारी एकनाथ देवके, विश्वनाथ पवार, कोळनुरे, रामचंद्र पवार आणि नामदेव ढगे यांनी या दोन्ही फरार आरोपींना आज जेरबंद केले आहे.

You may also like